मुंबई । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या भाषणाची तपासणी सुरू असून याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी दिली.
ते म्हणाले, अलीकडच्या काळात काही राजकीय पक्ष भडकावू भाषण करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. देशाचे आणि महाराष्ट्राचे ऐक्य आणि सामाजिक सलोखा या दृष्टिकोनातून ही बाब योग्य नाही. या सर्व बाबींवर राज्यसरकार लक्ष ठेवून आहे. त्यानुसार राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणाची तपासणी सुरू असून याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल.तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये ईडीच्या एका अधिकाऱ्यावर खंडणी रॅकेट चालवत असल्याचा आरोप केला होता. या संदर्भात संजय राऊत यांनी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार देखील केली होती. त्या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली असून, या एसआयटीचे प्रमुख विरेश प्रभू असणार आहेत.अशी माहितीही त्यांनी दिली आहे.