समर्थन केल्याने ‘त्यांचे’ही ट्विटर अकाउंट बंद!

मुंबई 
राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे ट्विटर अकाऊन्टही  अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहे.  मात्र थोरात यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ आपण ट्विट केल्यामुळे माझे ट्विटर अकाउंट बंद करण्यात आल्याचा आरोप केला आहे.
दिल्लीतील बलात्कार आणि हत्या प्रकरणात पीडित असलेल्या  नऊ वर्षाच्या बालिकेच्या पालकांनी दिल्लीत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली होती.  त्यावेळी त्यांनी आपल्याला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासंदर्भात विनंती केली होती.  मात्र या भेटीदरम्यान काढण्यात आलेले फोटो राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले होते.  त्यानंतर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने    ट्विटर,  दिल्ली पोलिसांकडे याबाबत कारवाईची मागणी केली होती.  त्यानुसार राहुल गांधी यांचे  अकाउंट अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले.  मात्र त्यानंतरही गांधी यांच्या समर्थनार्थ ज्या काँग्रेस नेत्यांनी ट्विट केले, त्यांचे  ट्विटर अकाऊंटदेखील ट्विटरकडून अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहे.  त्यात बाळासाहेब थोरात यांनी देखील राहुल गांधी यांच्या समर्थनात ट्विट केले  होते.  त्यामुळे आपलेही   अकाउंट बंद  करण्यात आल्याचा   आरोप त्यांनी केला आहे. मुंबई काँग्रेसचे ट्विटर अकाऊंट देखील ट्विटरकडून बंद करण्यात आले असल्याचा आरोप मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी केला होता.
Twitter account also closed indefinitely from Twitter

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *