चंदीगड। भाजप (BJP) पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे आमदार(Aam Aadmi Party MLAs in Punjab) फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच, प्रत्येक आमदाराला २५ कोटी रुपयांची ऑफर दिली जात असल्याचा खळबळजनक आरोप पंजाबमधील आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा (Harpal Singh Cheema)यांनी केला आहे.
चंदीगडमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यापूर्वी भाजपने गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र आणि अरुणाचल प्रदेशात असेच केले आहे. आता पंजाबमध्येही आपच्या आमदारांना लक्ष्य केले जात आहे असेही ते यावेळी म्हणाले. सीबीआय आणि ईडी या केंद्रीय एजन्सीदेखील आमदारांना भाजप पक्षात आणण्यासाठी वापरल्या जात आहेत,असा दावाही त्यांनी केला आहे. चीमा म्हणाले की, पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला फोडण्यासाठी भाजपने १३७५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प ठेवला आहे, जो काळ्या पैशातून गोळा करण्यात आला आहे. चीमा यांनी आरोप केला आहे की, गेल्या एका आठवड्यात आम आदमी पार्टीच्या ७ ते १० आमदारांना भाजपकडून संपर्क साधला जात आहे. तसेच, त्यांना थेट किंवा कोणत्याही माध्यमातून भाजपमध्ये सामील होण्यासाठी आमिष दाखवले जात आहे असेही ते म्हणाले आहेत.(Harpal Singh Cheema: BJP’s attempt to destroy AAP’s MLAs in Punjab too)