मुंबई । पावसाळी अधिवेशनाच्या सुरूवातीपासूनच विधानभवनाच्या पायऱ्यांवरील विरोधकांचे आंदोलन चर्चेचा विषय ठरत आहे. शिवसेनेच्या ४० बंडखोर आमदारांसह भाजपविरोधात शिवसेनेसह महाविकास आघाडीतील आमदार दररोज पायऱ्यांवर घोषणाबाजी करताना दिसून येत असताना आज मात्र याच पायऱ्यांवर शिंदे गटातील आमदारांसह भाजपने(BJP along with MLAs of Shinde group) ‘कब्जा’ मिळवला आणि ‘ ताट-वाटी, चलो गुवाहाटी, ५० खोके एकदम ओके. ५० खोके, खाऊन खाऊन माजलेत बोके, ५०-५० चलो गुवाहाटी’ अशा विरोधकांकडून सातत्याने होणाऱ्या घोषणांना प्रत्युत्तर देताना थेट शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवरही (Shiv Sena party chief Uddhav Thackeray) निशाणा साधला मात्र यावेळी संयमाचा बांध ढळल्याने जोरदार राडाही घातल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
दररोज विधानभवनाच्या पायऱ्यावर शिवसेनेच्या आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आमदार पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसांपासून शिंदे गटाविरुद्ध घोषणाबाजी होताना दिसत आहे. मात्र आज शिंदे गटातील आमदारांनी बॅनर घेऊन पायऱ्यांवर घोषणाबाजी सुरू केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि महेश शिंदे यांच्यात शाब्दिक खटका उडाला. झटापट सुरू असतानाच धक्काबुक्की करायची नाही, असे अमोल मिटकरी म्हणाले. त्यानंतर रोहित पवार, भरत गोगावले, प्रताप सरनाईक, अजित पवार यांनी मध्यस्थी केली. (Hangama on steps of Maharashtra Assembly)
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आमदारांसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांकडून शिंदे गटाविरोधात घोषणा दिल्या जात आहेत. ताट-वाटी, चलो गुवाहाटी, ५० खोके एकदम ओके. ५० खोके, खाऊन खाऊन माजलेत बोके, ५०-५० चलो गुवाहाटी अशा घोषणा सातत्याने दिल्या जात आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी (Chief Minister Eknath Shinde) नाराजीही व्यक्त केली. दररोज घोषणा दिल्या जात आहे , पण प्रत्येकाची सहन करण्याची हद्द असते असे मुख्यमंत्री शिंदे यांनी मंगळवारी सभागृहात स्पष्ट केले होते. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे २४ ऑगस्ट रोजी शिंदे गटाने ठाकरेंविरोधात मोर्चा उघडला.शिंदे गटाचे आमदार विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत असतानाच तिथे विरोधी पक्ष नेते अजित पवार, आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील आमदार आले. यावेळी शिंदे गटातील आमदार आणि महाविकास आघाडीतील आमदारांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, अमोल मिटकरी आणि शिंदे गटातील आमदारांमध्ये वाद झाला.
दोन्ही गटांच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. यावेळी शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मध्यस्थी करत दोन्ही बाजूंच्या आमदारांना मागे सारले. त्यानंतर तणाव निवळला आणि वाद मिटला.
भ्रष्टाचाराचे खोके, मातोश्री ओके… अनिल देशमुख खोके सिल्व्हर ओक ओके
शिंदे गटाच्या आमदारांनी भाजप आमदारांना सोबत शिवसेना व राष्ट्रवादीशी दोन हात करण्याचाच इशारा दिला आहे. भ्रष्टाचाराचे खोके, मातोश्री ओके अनिल देशमुख खोके सिल्व्हर ओक ओके, लावसाचे खोके सिल्व्हर ओक ओके, बेस्टचे खोके मातोश्री ओके, अशा पद्धतीच्या घोषणाबाजी ही याप्रसंगी करण्यात आली.
उद्धव ठाकरे यांची हजेरी
कालच शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानभवनात महाविकास आघाडीच्या बैठकीला हजेरी लावली होती. शिंदे गटाच्या ५० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता सातत्याने आदित्य ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांच्यावर टीका होत आहे.(Hangama on steps of Maharashtra Assembly)