Gujarat Assembly Election 2022: Voting in two phases in Gujarat, results on December 8

Gujarat Assembly Election 2022:गुजरातमध्ये दोन टप्प्यात मतदान, ८ डिसेंबरला निकाल

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये विधानसभेसाठी (Gujarat Assembly Election 2022) दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि आयुक्त अनुपचंद्र पांडे यानी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती दिली.

गुजरातमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार असून, ८ डिसेंबर रोजी निकाल घोषित केला जाणार आहे.या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. किंबहुना या निवडणुकीवर भाजपचे पर्यायाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुढील यश बळकट होणार असल्याचे मानले जात आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे.(Central Election Commission has announced the schedule for the Gujarat Assembly Elections) त्यानुसार गुजरात विधानसभेच्या १८२ जागांसाठी निवडणूक होणार आहे. २०१७ प्रमाणेच २०२२ मध्ये होत असलेल्या विधानसभेची निवडणुकही दोन टप्प्यात होणार आहे. १८२ जागांपैकी पहिल्या टप्प्यात ८९ जागांसाठी मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान १ डिसेंबर रोजी होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांसाठी मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान ५ डिसेंबर रोजी होणार आहे.

हिमाचल प्रदेश विधानसभा आणि गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम एकाच वेळी जाहीर केला गेला नसला, तरी दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे ८ डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे.(Gujarat Assembly Election 2022: Voting in two phases in Gujarat, results on December 8)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *