Gujarat: After victory, 'te' in BJP in two days!

Gujarat Assembly Election 2022:भाजपला मोठा धक्का,मोदींच्या ‘त्या’ सहकाऱ्याचा ‘रामराम’

अहमदाबाद ।गुजरात विधानसभा निवडणूक कार्यक्रमाची (Gujarat Assembly Election 2022)घोषणा झाल्यापासून   राजकीय घडमोडींना वेग आला आहे. भाजपसमोर  ‘आप’चे कडवे आव्हान आहे.(AAP has a tough challenge in front of BJP) त्यामुळे सर्वच  पक्षांकडून योग्य उमेदवारांची चाचपणी केली जात आहे.मात्र  या चाचपणी प्रक्रियेत तिकीट मिळण्याची शक्यता नसलेल्या सर्वच पक्षातील नेत्यांमध्ये आता अस्थिरता निर्माण झाली आहे. नेमक्या या पार्श्वभूमीवर मागील तीन दशकांपासून भाजपामध्ये असलेले तसेच विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)  गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद भुषवलेले जय नारायण व्यास (Jai Narayan Vyas) यांनी भाजपाला रामराम ठोकला आहे.

ते काँग्रेस किंवा आप पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आता वर्तविण्यात येत  आहे.जय नारायण व्यास मागील ३० वर्षांपासून भाजपात होते. या काळात त्यांना मोदी तसेच केशुभाई पटेल यांच्या मंत्रीमंडळात मंत्रीपद मिळले होते. मात्र पक्षाकडून तिकीट नाकारले जाण्याची शक्यता बळावताच त्यांनी भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच ते आगामी काळात  आप पक्षात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जय नारायण व्यास हे उच्चशिक्षित आहेत. त्यांनी आयआयटी मुंबईमधून शिक्षण घेतलेले आहे. अर्थशास्त्राचे त्यांना उत्तम ज्ञान आहे. त्यांनी भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा देताना कोणतेही ठोस कारण दिलेले नाही. राजीनाम्यात त्यांनी वैयक्तिक कारणामुळे मी राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे.(Gujarat Assembly Election 2022 ) 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *