Gujarat: After victory, 'te' in BJP in two days!

Gujarat:विजयानंतर ‘ते ‘  दोन दिवसात भाजपमध्ये!

जुनागड| गुजरात विधानसभा निवडणुकीतील (Gujarat Assembly Election)  भाजपच्या  (BJP) दैदिप्यमान विजयानंतर आता सोमवारी भूपेंद्र पटेल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत मात्र तत्पूर्वीच  राज्यात पक्षांतराचा खेळ सुरू झाला आहे. विशेष म्हणजे आम आदमी पार्टीचा (AAP)  १  व ३अपक्ष आमदार हे शपथविधी सोहळ्यापूर्वी भाजपमध्ये  प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. 

गुजरात विधानसभा निवडणूक २ टप्प्यात झाली. पहिल्या टप्प्याचे मतदान १ व दुसऱ्या टप्प्याचे मतदान ५ डिसेंबर रोजी झाले. त्यानंतर ८ डिसेंबर रोजी मतमोजणी झाली. त्यात भाजपला सर्वाधिक १५६ जागा मिळाल्या. तर काँग्रेसला १७ व आपला अवघ्या ५ जागांवर समाधान मानावे लागले.मात्र शपथविधी सोहळ्यापूर्वी पक्षांतराचा खेळ सुरू झाला आहे. आपचे आमदार भूपत भयाणी प्रथमच जुनागड जिल्ह्यातील विसावदर मतदार संघातून विधानसभेवर पोहोचलेत. ते यापूर्वीही भाजपमध्ये  होते.पण  निवडणुकीला काही दिवसांपूर्वीच   ते आपमध्ये  गेले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आपण भाजपमध्ये  जाणार नसल्याचा दावा केला होता.शिवाय  मी आपला धोका देणार नाही, असेही  ते म्हणाले होते मात्र  आता  त्यांच्याच  पक्षांतराची चर्चा गुजरामध्ये चांगलीच रंगत  आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर   भूपत भयाणी  आपमध्ये गेले होते. या जागेवर भाजपने काँग्रेसमधून आलेल्या हर्षद रिबाडिया यांना उमेदवारी दिली होती. तर काँग्रेसने करशन वडोदरिया यांना तिकीट दिले होते.   भूपत भयाणी यांचा   थेट सामना हर्षद रिबाडिया यांच्याशी होता. त्यात   भूपत भयाणी यांनी ६९०४ मतांनी रिबाडिया यांचा पराभव केला. भूपत भयाणी यांना ६५६७५, तर हर्षद रिबाडिया यांना५८७७१  मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या काँग्रेसच्या करशनभाई  वडोदरिया यांना अवघी १६७८१ मते मिळाली.

विसावदर विधानसभा मतदार संघावर गेल्या  अनेक वर्षांपासून भाजपचे वर्चस्व होते. ही जागा १९९५, १९९८, २००२ व २००७  मध्ये भाजपच्या ताब्यात होती. पण २०१२  च्या निवडणुकीत येथे जीपीपीचा उमदेवार निवडून आला. त्यानंतर २०१७ च्या निवडणुकीत  काँग्रेस नेते हर्षदकुमार रिबाडिया यांनी भाजपच्या किरीट बालुभाई पटेल यांचा पराभव केला.यंदा  निवडणुकीपूर्वी  हर्षदकुमार रिबाडिया यांनी  भाजपमध्ये  प्रवेश केला. मात्र  त्यांचा आपच्या भूपत  भयाणी यांच्याकडून पराभव झाला.आता आपचे  भूपत  भयाणी हेच भाजपच्या गोटात दाखल होणार असल्याची चर्चा रंगत आहे. (Gujarat: After victory, ‘te’ in BJP in two days!)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *