सातारा । राज्यातील सत्तांतरानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागले आहेत.सातारा जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या खेड ग्रामपंचायतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) गटाने तीन आमदारांना धक्का देत सत्तांतर घडवले आहे. कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या गटाने १२ जागा जिंकल्या तर भाजपचे आ. शिवेंद्रराजे भोसले, राष्ट्रवादीचे आ. मकरंद पाटील आणि शशिकांत शिंदे यांच्या गटाला पाच जागांवर समाधान मानावे लागले.साताऱ्यातील सर्वात मोठ्या आणि सातारा (SataraCity)शहरालगत असलेल्या खेड ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP)जबरदस्त धक्का बसला आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वात या ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने झेंडा फडकवला आहे.
शिंदे यांच्या खेड ग्रामविकास परिवर्तन पॅनेलने १७ पैकी १२ जागांवर विजय मिळवत सत्तांतर केले असून सरपंचपदही काबिज केले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने यापुर्वी पाटण विधानसभा मतदार संघातील उत्तर तांबवे ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवून सातारा (Satara)जिल्ह्यात खाते उघडले होते. आता सातारा तालुक्यातील खेड ग्रामपंचायतीची सत्ता काबीज करत शिंदे गटाने दुसरे खाते उघडले आहे. तीन आमदार आणि खासदार श्रीनिवास पाटील असे दिग्गज एका बाजूला असताना कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीला धक्का देत बाजी मारली आहे.(Gram Panchayat Election: NCP suffered a huge blow in Khed Gram Panchayat)
तर अमरावती जिल्ह्यातील 5 ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले आहे. या निकालांमध्ये काँग्रेस आणि भाजपचा डंका वाजला असून शिवसेना, राष्ट्रवादी व शिंदे गटाचा धुव्वा उडाला आहे. पाच ग्रामपंचायतींपैकी तीन काँग्रेसकडे, एक प्रहारकडे आणि एका ग्रामपंचायतवर भाजपाने झेंडा फडकवला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने यापुर्वी पाटण विधानसभा मतदार संघातील उत्तर तांबवे ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवून सातारा जिल्ह्यात खाते उघडले होते. आता सातारा तालुक्यातील खेड ग्रामपंचायतीची सत्ता काबीज करत शिंदे गटाने दुसरे खाते उघडले आहे. तीन आमदार आणि खासदार श्रीनिवास पाटील असे दिग्गज एका बाजूला असताना कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीला धक्का देत बाजी मारली आहे.