मुंबई
देशातील सरकार लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी येथे केली.ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मुंबई येथील ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानाला भेट देवून स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले ,त्यानंतर जयंत पाटील हे बोलत होते.

जयंत पाटील म्हणाले, ऑगस्ट क्रांती मैदानात ब्रिटिशांची जुलमी राजवट उलथवून टाकण्यासाठी भारत छोडोचा नारा दिला होता आणि अहिंसेचा मार्ग स्वीकारून ब्रिटीशांना परतवून लावले होते. आजही देशातील सरकार लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत आहे. पेगासससारख्या गोष्टी आणून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे. त्यामुळे आजही देश लोकशाही वाचवण्यासाठी, भारतीय संविधानाचा मान राखण्यासाठी एकवटल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.