पणजी।एकीकडे भाजपविरोधात देशात विरोधकांची आघाडी करण्याचे वक्तव्य शिवसेनेकडून होत असताना गोवा विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची यादी काँग्रेस लवकरच जाहीर करणार आहे. त्यातही
तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचा वेगळा दृष्टीकोन आहे. आमचा वेगळा दृष्टीकोन आहे. जर दोन्ही एकत्रित आले तर देशासाठी चांगले असेल, असे भाष्य माजी केंद्रीय मंत्री पी . चिदंबरम यांनी केल्याने राजकीय वर्तुळात तर्क वितर्क सुरु झाले आहेत.
एनडीएमधूनबाहेर पडल्यानंतर शिवसेना यूपीएमध्ये सामील होणार का, यावर सध्या चर्चा सुरू आहे. बुधवारी (दि. 8) शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रियांका गांधी वाड्रा यांची भेट घेतली. या भेटीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे राऊत यांनी सांगितले. भविष्यात काँग्रेस आणि शिवसेना आगामी उत्तर प्रदेश आणि गोवा विधानसभा निवडणुका एकत्र लढवू शकते, असे संकेतही राऊत यांनी दिले आहेत.या पार्श्वभूमीवर काँग्रेसने युपीएला एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी व्यक्त केले. भारतीय जनता पक्षाने मागील गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या तोंडातील घास काढून घेतला होता. जास्त आमदार असूनही काँग्रेसला सत्ता स्थापन करता आली नव्हती. यामुळे कॉंग्रेसने यावेळी गोव्याकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. आगामी काळात उत्तर प्रदेश व गोवामध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. आता शिवसेनेकडूनही या निवडणुकांसाठी काँग्रेसशी हातमिळणी करण्याचे संकेत देण्यात आल्याचे दिसत आहे.