Prashant Kishor, who was an election strategist for various political parties including BJP, then Congress and then JDU, will no longer be strategizing for others. Due to a tweet, such a discussion is going on in the political circles and as he hinted on Twitter that Prashant Kishor will now take his own side, what is the next strategy of Prashant Kishor?

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचे ‘ते’ विधान भाजपच्या पथ्यावर!

पणजी । प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचे एक मोठं विधान भाजपच्या वर्तुळात आनंदाचे ठरणार आहे. प्रशांत किशोर यांनी आगामी अनेक दशके भाजपला  सत्तेतून कुणीही हटवू  शकणार नाही असे भाकीत वर्तवले आहे. शिवाय काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही त्यांनी भाष्य केले आहे. गोव्यात आयोजित कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले असले तरी राजकीय वर्तुळात मात्र त्यांच्या वक्तव्यावरून रणकंदन होणार आहे. त्यातही प्रशांत किशोर यांच्या   काँग्रेस प्रवेशाच्या चर्चा आता संपुष्टात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपच्या सत्तेच्या स्वप्नांना सुरुंग लावणारे आणि भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या प्रचारातील हवा काढून घेणारे प्रशांत किशोर यांची  कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी  यांच्या काँग्रेस प्रवेश करण्यामागे रणनीती होती. तसेच तेही स्वतः काँग्रेस प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र गोव्यात सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेले विधान भाजपसाठी दिलासादायक ठरणारे असेच आहे. प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे की, भाजप आता पुढील अनेक दशकं सत्तेत राहील आणि राहुल गांधींना हे समजत नाही, ही  मोठी समस्या आहे.
… मोदींना उखडून टाकतील; पण भाजप हटणार नाही!निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भाजप हा भारतीय राजकारणाचे केंद्र बनणार आहे असे नमूद करताना भाजप जिंकेल किंवा हरेल मात्र स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या चाळीस वर्षात काँग्रेसची जी स्थिती होती, तशीच आता भाजपची आहे. एकदा तुम्हाला राष्ट्रीय स्तरावर ३० टक्क्याहून अधिक मते मिळाली,तर तुम्ही लवकर  हटू शकत नाही. असा दावाही त्यांनी केला. तसेच नागरिक नाराज आहेत आणि  संतापले आहेत.  त्यामुळे ते मोदींना सत्तेबाहेर करतील या गैरसमजात कुणीही राहू नये. एकवेळ मोदींना उखडून टाकू शकतात ;पण भाजप हटणार नाही. पुढील अनेक दशकं भाजप सत्तेत अथवा शक्तिशाली राहील असे राजकीय भाकीत प्रशांत किशोर यांनी वर्तवलं आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *