Eknath Shinde: We are Modi's people... Laugh at Modi too!

Eknath Shinde:आम्ही मोदींचेच लोक… मोदींनाही हसू अनावर!

मुंबई । मी दावोसला गेलो होतो. दावोसमध्ये अनेक पंतप्रधान होते. मला ते मोदींबद्दल विचारत होते. तिथे लक्जमबर्गचे पंतप्रधान मला भेटले आणि ते म्हणाले, ‘मी मोदींचा भक्त आहे’. जर्मनी आणि इतर काही जण भेटले त्यांनी विचारलं की, ‘तुम्ही मोदींसोबत आहात ना?’ मी त्यांना सांगितले  की आम्ही मोदींचेच लोक आहोत. मोदींच्या लोकप्रियतेचा डंका दावोसमध्येही ऐकायला मिळाला , असा अनुभव  मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे ((CM Eknath Shinde Speech in BKC)) सांगत असताना  पंतप्रधान नरेंद्र  मोदींनाही ((PM Narendra Modi in Mumbai))  हसू अनावर झाले. 

 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थित विविध विकासकामांचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  जोरदार भाषण करत विरोधकांना लक्ष्य केले.  यावेळी शिंदेंनी दावोसमधील प्रसंगही सांगितला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलेला प्रसंग ऐकून पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही  हसू आवरता आले  नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले ,आम्ही मोदींच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय. या सरकारने सहा महिन्यात केलेली काम तुम्ही पाहिली असतील. आपण जे करतोय, त्यामुळे सगळ्यांना पोटदुखी उठली आहे. मळमळ सुरू झाली आहे. पायाखालची वाळू सरकली आहे. छातीत धडकी भरली आहे . हे सरकार एवढं काम करू शकते , तर पुढच्या दोन वर्षात काय होईल? म्हणून याचा सगळ्यांना त्रास होतोय , अशी टीका शिंदेंनी विरोधकांना लक्ष्य करताना केली.(Eknath Shinde: We are Modi’s people… Laugh at Modi too!)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *