The Eknath Shinde group has demanded the freezing of Shiv Sena's arrow symbol in the Supreme Court. The Supreme Court will next hear it on September 27. However, if the symbol is frozen, it may affect Uddhav Thackeray in the upcoming municipal and local government elections. However, the arrow symbol It has been frozen or else the Eknath Shinde group will be in a dilemma, now arguments have started in the political circle. In fact, after the 1989 Lok Sabha elections, the Shiv Sena got the official symbol of the bow and arrow. After that, the bow and arrow became the identity of Shiv Sena in every election. The Shiv Sainiks have established the symbol of bow and arrow in the minds of the people in every corner of Maharashtra.

Eknath Shinde vs. Uddhav Thackeray: धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यास कुणाला फायदा, कुणाला तोटा !

 शिवसेनेची धनुष्यबाण ही निशाणी (Shiv Sena’s arrow symbol) गोठवावी अशी मागणी   एकनाथ शिंदे गटाने (Eknath Shinde group) सर्वोच्च न्यायालयात  केली आहे.त्यावर सर्वोच्च न्यायालय  (Supreme Court)पुढील सुनावणी २७ सप्टेंबर रोजी करणार आहे.मात्र जर  निशाणी गोठवल्यास  येत्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत याचा फटका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांना बसू शकतो.मात्र  धनुष्यबाण चिन्ह गोठवले गेले नाहीतर एकनाथ शिंदे गटाची कोंडी होणार असल्याने आता यावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरु झाले आहेत.  

वास्तविक १९८९ च्या झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेला धनुष्यबाण हे अधिकृत निशाणी मिळाली. त्यानंतर प्रत्येक निवडणुकीमध्ये धनुष्यबाण ही शिवसेनेची ओळख ठरली. शिवसैनिकांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धनुष्यबाण ही निशाणी लोकांच्या मनात रुजवली. अगदी अशिक्षित आणि वृद्ध लोकांनाही धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह असल्याचे ठळकपणे लक्षात राहिले. त्यामुळे अनेकवेळा उमेदवार न पाहता मतदार धनुष्यबाण या चिन्हावर मतदान करत असतो. त्यामुळेच सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आणि एकनाथ शिंदे गटात चिन्हावरून कायदेशीर रस्सीखेच सुरू आहे. धनुष्यबाण ही शिवसेनेची ओळख आहे. या चिन्हावर आधारित शिवसेनेचा पारंपारिक मतदार आहे.सद्यस्थितीत  एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत कायदेशीर लढाई सुरू असली तरी  केंद्रीय निवडणूक आयोग किंवा सर्वोच्च न्यायालयाने धनुष्यबाण ही निशाणी गोठवल्यास त्याचा थेट मोठा फटका उद्धव ठाकरे यांना बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवला जात  आहे. त्यातही आपणच शिवसेना आहोत. शिवसेनाप्रमुख  बाळासाहेबांचे विचार आपणच  पुढे घेऊन जात आहोत असा दावा  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कितीही करत असले तरी उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहेत, हे वास्तव आहे.  त्यामुळेच  उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख म्हणून शिवसेनेचा कारभार पाहत  आहेत. (Eknath Shinde vs. Uddhav Thackeray) मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याचाही कारभार चालवला आहे. त्यामुळे धनुष्यबाण ही निशाणी उद्धव ठाकरे यांना मिळाली तर, त्याचा थेट फायदा त्यांना होऊ शकेल. मात्र ही निशाणी गोठवल्यास सामान्य शिवसैनिक आणि महाराष्ट्राच्या जनतेत संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्याचा फटका उद्धव ठाकरे यांना आगामी निवडणुकीत बसू शकतो.हे हेरूनच एकनाथ शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात धनुष्यबाण निशाणी गोठवण्याची मागणी करण्यात आली आहे.(Eknath Shinde vs. Uddhav Thackeray: If the bow and arrow symbol is frozen, someone will benefit, someone will lose!)
 
१९८९ नंतर धनुष्यबाण चिन्हाची मागणी
शिवसेना १९६६ साली एक संघटना म्हणून उदयास आली होती. मात्र त्यानंतर राजकारणात सक्रिय भाग घ्यायला सुरुवात केली. शिवसेनेने १९८९ च्या आधी ज्या काही  निवडणुका लढवल्या. त्यावेळी शिवसेनेला ढाल, तलवार, नारळ, कपबशी, रेल्वे इंजिन आणि धनुष्यबाण अशा चिन्हांवर निवडणुका लढवाव्या लागत होत्या. या चिन्हांमध्ये धनुष्यबाण हे चिन्ह बाळासाहेब ठाकरे यांना खूप आवडले होते. श्रीरामाकडे धनुष्यबाण असते  म्हणून आपल्या पक्षाला धनुष्यबाण हे चिन्ह मिळावे अशी इच्छा बाळासाहेबांची होती. त्यामुळे १९८९ ला झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धनुष्यबाण या चिन्हाची मागणी केली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *