Eknath Shinde in trouble:ढाल- तलवार या चिन्हावरच आक्षेप

नांदेड ।मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ढाल तलवार (Objection to shield-sword symbol)या चिन्हावर नांदेडच्या शीख बांधवांनी आक्षेप घेतला आहे. सचखंड गुरूद्वारा बोर्डाचे माजी सचिव रंजीत सिंह कामठेकर यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्र पाठवले  आहे.परिणामी राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे. आता शिंदे गट त्यातून कसा मार्ग काढतो यासह निवडणूक आयोगाची भूमिका काय ? (Eknath Shinde in trouble) याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.   

निवडणूक आयोगाने  अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गट आणि शिंदे गटाला पक्षचिन्ह आणि पक्षाची नावे  दिली आहेत. शिवसेना हे नाव वापरण्यास दोन्ही गटांना बंदी घालण्यात आली असून शिवसेनेचे  चिन्ह असलेले  धनुष्यबाणही हे चिन्हही गोठवण्यात आले  आहे. यात निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव  तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असे  नाव देण्यात आले  आहे.  त्यात  ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिले  होते . तर शिंदे गटाला दुसऱ्या तीन चिन्हांचा पर्याय देण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर शिंदे गटाकडून ढाल-तलवार, उगवता सूर्य आणि पिंपळाचं झाड अशी तीन चिन्हे  देण्यात आली होती. त्यातील ढाल-तलवार हे चिन्ह निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला देण्यात आले . मात्र आता शीख समुदायाने पत्र लिहून हे या चिन्हावर आक्षेप घेतला आहे.विशेष म्हणजे त्रिशूळ हे धार्मिक चिन्ह असल्याने  उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ते नाकारण्यात आले मग  याच प्रमाणे तलवार हेदेखील खालसा पंथाचे  धार्मिक प्रतीक आहे. त्यामुळे हे चिन्ह निवडणूक आयोगाने द्यायला नको होते  असेही शीख समुदायाने म्हटले  आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या चिन्हाचे  काय होणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे.(Eknath Shinde in trouble: Objection to shield-sword symbol)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *