मुंबई ।मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळ (The first phase of Cabinet expansion of Chief Minister Eknath Shinde)विस्ताराचा पहिला टप्पा अखेर पार पडला असून या विस्तारामध्ये एकूण 18 मंत्र्यांचा शपथविधी झाला. राज भवनात पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्यानंतर एकनाथ शिंदे गटामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचे बोलले जात आहे. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारानंतर सरकारमधील आमदारांमध्ये कोणतीही नाराजी नाही. तसेच नाराजी असल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis)हे आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी सक्षम असल्याचे मंत्री अतुल सावे यांनी सांगितले आहे. तसेच आज सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही प्रमुख नेते चर्चा करून खातेवाटप बाबत निर्णय घेणार असल्याची माहितीही सावे यांनी दिली आहे.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर कोणी आमदार नाराज नाही. जर कोणी आमदार नाराज असेल तर त्याची नाराजी पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये दूर केली जाईल. तसेच राज्यामध्ये असलेले एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करेल. गेल्या अडीच वर्ष महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारमुळे महाराष्ट्र मागे पडला होता. मात्र आता नवीन सरकार हे जनतेसाठी काम करेल. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर पुन्हा एकदा जबाबदारी टाकली असून ही जबाबदारी आपण समर्थपणे पार पाडू अशी आशा एकनाथ शिंदे सरकारमधील मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केली आहे.तसेच मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिला टप्पा पार पडला असून खातेवाटपबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. मात्र आज रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही प्रमुख नेते चर्चा करून खातेवाटप बाबत निर्णय घेणार असल्याची माहिती अतुल सावे यांनी दिली आहे.(Eknath Shinde government: The cabinet has been expanded, ‘they’ are capable for the disgruntled!)