The Cabinet has been expanded 39 days after Eknath Shinde and Devendra Fadwanis were sworn in as Chief Minister and Deputy Chief Minister respectively on June 30. The Shinde-Fadnavis government was continuously criticized as the cabinet was not expanded. But today, after the expansion, Chief Minister Eknath Shinde has taunted the opposition party with 'Intezaar ki Ghadiya Kham hui'.

Eknath Shinde government:मंत्रिमंडळ विस्तारानंतर ‘या ‘ शब्दात विरोधकांना टोमणा !

मुंबई| एकनाथ शिंदे व देवेंद्र फडवणीस यांनी 30 जून रोजी अनुक्रमे  मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर 39 दिवसांनंतर   मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे. मंत्रिमंडळ विस्तार   होत नसल्याने सातत्याने शिंदे – फडणवीस सरकारवर टीका होत होती. परंतु, आज विस्तार ( maharashtra cabinet expansion)झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (( Eknath Shinde on Cabinet Expansion )) यांनी’ इंतजार की घडिया खत्म हुई’  अशा पद्धतीचा  टोमणा विरोधी पक्षाला लगावला आहे.

मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. लवकरच, लवकरच, लवकरच अशा पद्धतीचा टोमणा वारंवार विरोधी पक्ष नेते अजित पवार  (Opposition leader Ajit Pawar)यांनी शिंदे – फडवणीस (Shinde – Fadwanis) या दोन व्यक्तींच्या सरकारला लगावला होता. त्यावरूनच अखेर  39 दिवसांनंतर शिंदे – फडणवीस सरकारला मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त सापडला व   18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ही शपथ घेतल्यानंतर आता लवकरच पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा दुसरा टप्पा सुद्धा पूर्ण केला जाणार आहे. या कारणावरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘इंतजार की घडिया खत्म हुई’असे सांगत विरोधी पक्षाला टोमणा लगावला आहे.

भाजपकडून (BJP)मंत्रिपदाची शपथ घेतलेले आमदार : राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुरेश खाडे, विजयकुमार गावित, रवींद्र चव्हाण, अतुल सावे व मंगल प्रभात लोढा. 

शिवसेनेकडून  (SHIVSENA)मंत्रीपदाची शपथ घेतलेले आमदार : संदिपान भुमरे, उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार, संजय राठोड, दीपक केसरकर, तानाजी सावंत व शंभूराज देसाई. Eknath Shinde government: After the expansion of the cabinet, taunt the opponents with the word ‘Ya’!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *