POLITICSMAHARASHTRA Eknath Shinde-Devendra Fadnavis-Ajit Pawar Government

Eknath Shinde-Devendra Fadnavis-Ajit Pawar Government:…शिंदे गटाची अवस्था, ‘सांगता येत नाही आणि सहनही होत नाही’

मुंबई। महाविकास आघाडी सरकारच्या काळात अजित पवारांनी (Ajit Pawar) विकास निधी दिला नाही म्हणून बंड करणाऱ्या विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde)आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत राज्याचा कारभार पाहावा लागणार आहे. राष्ट्रवादीतील (NCP  ) अजित पवारांच्या गटाने सत्ताधाऱ्यांना साथ देऊन मंत्रिमंडळात स्थान मिळवले आहे मात्र त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार मात्र आता धास्तावले असून नाराजही झाल्याचे चित्र आहे. त्यात आता काहीजण नाराज होऊन काय करणार ? अशी हतबलता व्यक्त करत असल्याने शिंदे गटातील आमदारांची अवस्था आता ‘सांगता येत नाही आणि सहनही होत नाही ‘ अशी झाली आहे.(Maharashtra Politics)
राज्यात तीन चाकी महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे फडणवीस सरकार गेल्या वर्षीच्या जून महिन्यात सत्तेवर विराजमान झाले.  आता या डबल इंजिन सरकारला   राष्ट्रवादीतील अजित पवारांच्या गटाने सत्ताधाऱ्यांना साथ दिल्याने हे सरकार पुन्हा तीन चाकी सरकार बनले  आहे.विशेष म्हणजे  अजित पवारांवर टीका करूनच एकनाथ शिंदे महाविकास आघाडीतून बाहेर पडले होते. आता पुन्हा त्यांना मंत्रिमंडळात संधी दिल्याने शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चा आहेत. यावरून शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले (mla bharat gogavale)यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले  आहे.(power struggle in maharashtra)
राष्ट्रवादीच्या येण्याने शिंदे गट नाराज आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला. त्यावर ते म्हणाले की,  नाराज होऊन काय करणार? वस्तुस्थिती स्वीकारावी लागणार आहे. थोडीफार नाराजी राहणार आहे. ज्यांना एक भाकरी खायची होती, त्यांना अर्धी मिळाली, ज्यांना अर्धी खायची होती त्यांना पाव भाकरी मिळाली. सगळं समीकरण घेऊन पुढे चालायचं असेल तर हे समीकरण स्वीकारायला पाहिजे , असं भरत गोगावले म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात अजित पवारांनी विकास निधी दिला नाही म्हणून शिंदेंनी बंड केलं होतं, मग आता परत अजित पवारांसोबतच काम करावं लागणार आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर भरत गोगावले म्हणाले की,  देशहित आणि राज्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जे निर्णय घेतले आहेत ते मान्य करणं क्रमप्राप्त आहे. त्यांना कोणतं खातं द्यायचं हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील.  दरम्यान, राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील किती आमदारांना मंत्रिपदे मिळणार याची उत्सुकता प्रत्येकाला आहे. (Eknath Shinde-Devendra Fadnavis-Ajit Pawar Government:…Shinde group’s condition is ‘unspeakable and unbearable’) 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *