A broken bow and arrow is a state of affairs. But now there is no point in blaming others. Uddhav Thackeray must have made some mistakes. NCP leader Eknath Khadse has reacted saying that a mistake should not be so big that it will end the party. Khadse made this criticism in Jalgaon after freezing the current status of Uddhav Thackeray's Shiv Sena and freezing the party's name and symbol. Eknath Khadse said, there is no point in blaming others.

Eknath Khadse’s criticism of Thackeray: धनुष्यबाण मोडला… वर्षानुवर्षाची पुण्याई गोठवली!

जळगाव ।  धनुष्यबाण मोडला ही वस्तूस्थिती आहे. मात्र आता इतरांना दोष देण्यात   अर्थ नाही. उद्धव ठाकरेंकडून काही चुका झाल्या असतील. एखादी चूक एवढी मोठी नसावी की, त्यामुळे पक्ष संपून जाईल, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी (NCP leader Eknath Khadse) प्रतिक्रिया दिली आहे. 

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सद्यस्थिती आणि पक्षाचे नाव, चिन्ह गोठवल्यानंतर खडसे यांनी ही टीका  जळगावमध्ये केली. एकनाथ खडसे म्हणाले, इतरांना दोष देण्यात अर्थ नाही. उद्धव ठाकरेंनी काय केले आणि एकनाथ शिंदे यांनी काय केले हे आता बोलून फायदा नाही.   काही चुका उद्धव ठाकरे यांच्याही  असतील. ते पक्षप्रमुख आहेत, त्यामुळे चुका होऊ शकतात. पण धनुष्यबाण मोडले ही वस्तूस्थिती आहे. एवढी चूक  मोठी नसावी की, त्यामुळे पक्ष संपावा. तुम्ही संपले आणि तेही संपले.

 ठाकरे आणि शिंदे यांच्या भांडणात वर्षानुवर्षाची पुण्याई गोठवली गेली. यापेक्षा दुर्दैवी प्रसंग नसावा, असे म्हणत एकनाथ खडसेंनी खंत व्यक्त केली. वाडवडिलांनी आयुष्यभर जे कमवलं ते एका मिनिटामध्ये मुलांनी गमावल्याचेही खडसे म्हणाले.

हा दुर्दैवी प्रसंग (Eknath Khadse’s criticism of Thackeray: Punai has been frozen for years!)खडसे काल टीका करताना म्हणाले होते की, आयुष्यभर बाळासाहेब ठाकरे यांनी जी मेहनत केली, ज्या धनुष्यबाणाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. ज्या धनुष्यबाणाच्या जोरावर या महाराष्ट्रामध्ये सत्ता मिळवली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. वर्षानुवर्षाची पुण्याई दोघांच्या भांडणांमध्ये गोठवली गेली. यापेक्षा दुर्दैवी प्रसंग नसावा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *