पुणे |एकीकडे सत्ताधारी भाजपाच्या वतीने शहरभर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी पोस्टरबाजी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे पुणे शहर काँग्रेसच्यावतीने ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी गो बॅक’ (‘Prime Minister Narendra Modi go back’) असे पोस्टर लावण्यात आले. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहा मार्चला पुणे शहर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान पुण्यातील मेट्रो आणि इतर विकासकामांचे उद्घाटन करणार आहेत. मात्र, मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी पुण्यात जोरदार विरोध होत आहे. पुणे शहर काँग्रेस पक्षाच्यावतीने भवानी पेठ व डेक्कन परिसरामध्ये ‘गो बॅक मोदी’ असे पोस्टर लावण्यात आले आहे. महाराष्ट्र काँग्रेसमुळे
( Due to Maharashtra Congress Corona spread) कोरोना पसरला, असे वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी केले होते. त्यामुळे पुणे शहरात काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘गो बॅक मोदी’ असे पोस्टर लावले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या रविवारी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. एकीकडे भाजपाने त्यांच्या आगमनाची तयारी केली आहे. तर, दुसरीकडे प्रशासन देखील सुरक्षेच्या दृष्टीने सज्ज झालेले पहायला मिळत आहे. मोदींच्या दौऱ्यानिमित्त पुणे शहरात आणि जिल्ह्यात पॅराग्लायडींग, हॉट बलून इत्यादी उड्डाणांना निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.