NCP supremo Sharad Pawar and state Home Minister Dilip Walse-Patil met at YB Center in Mumbai. The visit sparked a political debate. However, Home Minister Dilip Walse Patil, while talking to the media, clarified that various issues besides politics were discussed.

Dilip Walsepatil: चर्चेतील सगळेच विषय बाहेर सांगता येत नाही 

मुंबई| 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची (  state Home Minister Dilip Walse-Patil met)  मुंबईतील वाय बी सेंटर येथे भेट झाली. या भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण आले. मात्र, राजकीय व्यतिरिक्त विविध विषयांवर चर्चा झाल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.शिवाय चर्चेतील सगळेच विषय बाहेर सांगता येत नाही हेही त्यांनी सांगितले. 

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले  की, आज शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्यासोबत भेट झाली. राज्य गृह विभागाचे मुख्य सचिव आनंद लिमये, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेतील सगळेच विषय बाहेर सांगता येत नाहीत. कोणत्याच राजकीय चर्चा यावेळी झाल्या नाहीत. काँग्रेसच्या नेत्या आणि राज्यातील मंत्री वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख यांनी तलवार नाट्य केले. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत गृहमंत्र्यांना विचारले असता, सध्या काही माहिती नाही. माहिती घेऊन सांगतो. मात्र अशा प्रकरणात काही तथ्य असेल तर कारवाई केली जाते, असे वळसे – पाटील म्हणाले. मुख्यमंत्री नाराज नाहीत, माझे त्यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांनी माझं अभिनंदन केल्याचे वळसे  पाटील यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *