Digvijay Singh... People want to vote, but the election management of Congress is also weak

Digvijay Singh: लोकांना  मते द्यायची ;पण काँग्रेसचे निवडणूक व्यवस्थापनही   कमकुवत  

 सिहोर।मध्य प्रदेशात  काही महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका (Assembly elections   in Madhya Pradesh) पार पडणार आहेत. अशात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांनी पक्षाच्या हायकमांडची कानउघडणी केली आहे. काँग्रेसची (Congress) संघटना कमकुवत झाली असून मतदानाच्या दिवशीही सुद्धा काँग्रेसचे  निवडणूक व्यवस्थापन कमकुवत ( election management of Congress weak)असते, असे  मत दिग्विजय सिंह यांनी मांडले आहे.

 मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. २०१८ साली ज्या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा पराभव झाला, त्याठिकाणी दिग्विजय सिंह भेटी देत आढावा घेत आहेत. दिग्विजय सिंह यांनी मध्य प्रदेशातील ६६ जागांचा अहवाल तयार केला आहे.

मध्य प्रदेशातील सिहोर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिग्विजय सिंह म्हणाले,  काँग्रेस पक्ष संघटित नाही, हे मान्य करायला हरकत नाही. मतदानाच्या दिवशी निवडणूक व्यवस्थापनात फार मोठी कमतरता असते. ज्या प्रकारची तयारी करायला हवी, तशी तयारी करण्यात येत नाही. लोकांना काँग्रेसला मतदान करायचे  आहे; पण, आमची संघटना कमकुवत असल्याने ते करू शकत नाहीत, अशी खंतही दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केली.

राज्यात पराभव झालेल्या जागांना भेटी देऊन अहवाल तयार केला जाईल. तो अहवाल माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याकडे  सोपण्यात येईल. त्यानंतर निवडणुकीसाठी नवीन पद्धतीने रणनीती आखण्यात येणार आहे,  असेही दिग्विजय सिंह यांनी स्पष्ट केलंय.

Digvijay Singh: People want to vote, but the election management of Congress is also weak

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *