Devendra Fadnavis: राज्यात कोणताही नेतृत्व बदल नाही!

मुंबई। राष्ट्रवादीतील(NCP) एक गट फुटून भाजपसोबत (BJP) सत्तेत विराजमान झाला मात्र त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या गटात सुरुवातीला धाकधुकीचे वातावरण निर्माण झाले. उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे अजित पवार (Ajit Pawar) हेच पुढचे मुख्यमंत्री (Who is the next chief minister?) या चर्चेला जोर आला ;पण आता या चर्चेवर पडदा पडला आहे. राज्यात यापुढे कोणताही नेतृत्व बदल होणार नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय यापुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व मी आहे त्याच पदावर राहणार आहोत. त्यात कोणताही बदल होणार नाही, असेही त्यांनी सांगितले आहे. 

 काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची गुरुवारी विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. त्यानंतर त्यांचे अभिनंदन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  हे   स्पष्टीकरण दिले.

 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 2019 हे वर्ष एक वेगळ्या प्रकारचे ठरले. यात अनेकांनी विक्रम केले. आमचे पहिले हिरो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यांनी सत्ता परिवर्तन घडवून आणले. ते आता मुख्यमंत्री म्हणून कारभार चालवत आहेत. त्यानंतर अजित पवार हे आमचे दुसरे हिरो आहेत. प्रथम ते माझ्यासोबत उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांसोबत उपमुख्यमंत्री झाले. नंतर ते विरोधीपक्षनेते झाले. आता आमच्यासोबत पुन्हा उपमुख्यमंत्री झाले.

त्यांच्या खालोखाल माझा क्रमांक आहे. अगोदर मी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर विरोधी पक्षनेता झालो. आता पुन्हा उपमुख्यमंत्री झालो. पण आता यात कोणताही बदल होणार नाही. आता आम्ही ज्या पदावर आहोत, त्याच पदावर राहणार आहोत. आम्ही आमच्या जबाबदारीवर समाधानी आहोत, असे फडणवीस म्हणाले.

अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केली. त्यानंतर ते शिंदे – फडणीस सरकारमध्ये सहभागी झाले. तेव्हापासून ते मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा रंगली आहे. यावर फडणवीस यांनी आतापर्यंत कोणतेही भाष्य केले नव्हते. पण गुरुवारी विधानसभेत बोलताना त्यांनी या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे  उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दोन दिवसांपूर्वीच राज्यातील नेतृत्व बदलाची चर्चा फेटाळली होती. ते म्हणाले होते की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आहेत. मी व देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून काम करतोय. त्यामुळे आम्हाला मिळालेली जबाबदारी नीट पार पाडू द्या. कार्यकर्त्यांनी स्वतःचे समाधान करण्यासाठी माझ्या मुख्यमंत्रीपदाचे बॅनर लावले असतील.(Devendra Fadnavis: There is no leadership change in the state!)

आणखी एक राजकीय अंक रंगण्याची शक्यता

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या स्वप्नांना तडा गेला काय? या प्रश्नाबरोबरच उपमुख्यमंत्री पदासाठी अजित पवार सत्तेत कसे काय जाऊ शकतात या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगत असून राष्ट्रवादीने  हे सर्व ‘ठरवून’ केले आहे या संशयाला यामुळे  पुष्टी मिळाली आहे. त्यातही 

भाजपकडून अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर असल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यामुळे राज्यात येत्या काळात आणखी एक राजकीय अंक रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *