In Kasba Assembly By-Election, many attempts are being made by the opposition to spread misinformation. It is said that various communities are particularly upset, but in reality there is nothing like that. Only rumors are being created that the Brahmin community is angry. Ask the Congress candidate's stance on Puneshwar Mahadev. Deputy Chief Minister of the state Devendra Fadnavis said that votes are being polarized by Congress and Nationalist Congress Party in this election.

Devendra Fadnavis:ब्राह्मण समाज नाराज असल्याच्या फक्त अफवा 

पुणे। कसबा विधानसभा मतदारसंघाच्या  पोटनिवडणुकीत (Kasba Assembly By-Election) अनेक अप्रचार करण्याचे प्रयत्न विरोधकांकडून केले जात आहेत. विशेष करून विविध समाज नाराज असल्याचे सांगितले जात आहे , पण प्रत्यक्षात तसे काहीही नाही. ब्राह्मण समाज (Brahmin community)नाराज असल्याच्या फक्त अफवा निर्माण केल्या जात आहेत. काँग्रेसच्या उमेदवाराला पुणेश्वर महादेवाबाबत भूमिका विचारा. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून मतांचे ध्रुवीकरण केले जात आहे, असा घणाघात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी  केला.

  कसबा विधानसभा मतदारसंघाचे भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ रोड शोचे आयोजन करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते. यावेळी फडणवीस म्हणाले, कसबा मतदारसंघ (Kasba Assembly Constituency)  हा हिंदुत्ववादी (Hindutva) आहे, हे छत्रपती शिवरायांचे पुणे आहे.हा मतदारसंघ भाजपचा    आहे.

गिरीश बापट यांनी कसबा मतदारसंघ बांधला आहे. या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार निवडून येणार नाही.भाजपचा कार्यकर्ता कसा असतो हे गिरीश बापट यांच्याकडे बघून लक्षात येईल. आजारी असताना देखील त्यांनी पक्षासाठी बैठक घेतली. त्यांच्या आवाहनावर आता आपल्याला येत्या २६ तारखेला हेमंत रासने यांना मतदान करून ही निवडणूक जिंकायची आहे. विरोधकांनी या निवडणुकीत अनेक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फडणवीस यांनी या वेळी केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *