Chandrapur: It has come to light that the work of Jalayukta Shivar Yojana, which is considered as an ambitious plan of the then Chief Minister Devendra Fadnavis, has caused a lot of confusion in Chandrapur district. Out of the 125 crore funds received by the district, many works have been shown only on paper. The Nationalist Congress Party (NCP) has exposed this scandal in the district and demanded a state-level inquiry into the whole matter at a press conference.

Devendra Fadnavis in trouble:जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची पोलखोल

चंद्रपूर ।

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांची महत्वाकांक्षी योजना समजल्या जाणाऱ्या जलयुक्त शिवार (work of Jalayukta Shivar Yojana) योजनेच्या कामात चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घोळ झाला असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्याला मिळालेल्या तब्बल 125 कोटींच्या निधीतून अनेक कामे केवळ कागदावर दाखवण्यात आल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील हे घबाड राष्ट्रवादी काँग्रेसने ( NCP)  उघडकीस आणले असून, या संपूर्ण प्रकरणाची राज्यस्तरीय  (state-level inquiry) चौकशी करण्याची मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यासाठी अशी 10 हजार 391 कामे (10 thousand 391 such works were taken out for Chandrapur district.)काढण्यात आली. यासाठी तब्बल 125 कोटी 34 लाख 81 हजारांचा निधी वितरित करण्यात आला. मात्र, या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले. या कामांचे मुल्यमापन, पाहणी आणि सर्वेक्षण करण्यासाठी राज्य सरकारने 2017 साली एक खासगी त्रयस्थ समिती नेमली. एएफसी इंडीया या संस्थेच्या सदस्यांनी या कामाची पाहणी केली आणि त्यांनी दिलेल्या अहवालातून मोठे घबाड समोर आले. जे काम प्रत्यक्षात झालेच नाही ते काम कागदावर पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आले. त्याचे पैसेही कंत्राटदाराला मिळाले. एकच काम दोन वेगवेगळे काम असल्याचे दाखवत दोनदा पैसे लाटण्यात आले. ही तर एकट्या चंद्रपूर जिल्ह्याची बोंब आहे, महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात देखील हीच स्थिती असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे, या योजनेच्या कामाच्या संदर्भात सनदी अधिकाऱ्यांच्या स्तरावर चौकशी कारण्याची मागणी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड यांनी पत्रकार परिषदेत केली.
या कामांचा समावेश 
भूजलपातळी वाढावी आणि सिंचनाची सुविधा व्हावी यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात राज्यात जलयुक्त शिवार योजना आणण्यात आली. कृषी विभाग, वनविभाग, जिल्हा परिषदेचा लघू पाटबंधारे विभाग, राज्य शासनाचा लघू पाटबंधारे विभाग, जलसंपदा विभाग आणि पंचायत समिती (Agriculture Department, Forest Department, Minor Irrigation Department of Zilla Parishad, Minor Irrigation Department of State Government, Water Resources Department and Panchayat Samiti.)अशा विभागांमध्ये या योजनेच्या कामांची वाटणी करण्यात आली. सिमेंट नाला बांध, नाला खोलीकरण, वनविभागाच्या पाण्याच्या टाकीचे खोलीकरण, टाक्यांची सुधारणा, धरण सुधारणा अशा कामांचा यात समावेश होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *