वर्धा ।महात्मा गांधीजीमुळेच स्वातंत्र्याला एक वेगळी दिशा मिळाली आहे. त्यांच्यामुळे सामान्य नागरिक स्वातंत्र्य युद्धात सहभागी झाला. त्यामुळेच आज आपल्याला स्वातंत्र्याचा दिवस पाहायला मिळत असल्याचे मत व्यक्त करतानाच महात्मा गांधी यांनी तळागाळातील लोकांसाठी दिलेल्या संदेशानुसार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)हे कार्य करत असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis )यांनी केले.
वर्ध्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त (Amrit Mahotsav of Independence) भाजपाच्यावतीने तिरंगा बाईक रॅलीचे (BJP organized a tricolor bike rally)आयोजन केले होते.त्यावेळी फडणवीस बोलत होते.ते म्हणाले, महात्मा गांधीजींनी तळागळातील लोकांची सेवा करण्याचा संदेश दिला. तेच काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत. गरीब कल्याण अजेंडाच्या माध्यमातून कार्य सुरु आहे. देशात ३ कोटी जनतेला घर, ५ कोटी महिलांना गॅस सिलेंडर, ६ कोटी जनतेला नळ जोडणी दिली आहे. महात्मा गांधींचे स्वप्न होते की शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचला पाहिजे. आम्ही या निमित्ताने अविरत परिश्रम घेऊन राष्ट्रभक्तीचा संकल्प करण्यासाठी प्रयत्न करू.सेवाग्रामच्या पावन भूमीत बापू कुटीत आले की, आत्मिक समाधान लाभत एक वेगळी ऊर्जा मिळते. यातच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना जे स्वातंत्र्य आपण आनंदात साजरे करत आहोत, हे त्यांच्यामुळेच मिळाले आहे. असेही फडणवीस यावेळी म्हणाले.(Deputy Chief Minister Devendra Fadnavis: Prime Minister Modi’s work started as per Mahatma Gandhi’s message)