Ajit Pawar criticizes Eknath Shinde government: If all the work is done by the secretary, why should the Chief Minister?

Deputy CM Ajit Pawar :’दरेकर साहब को गुस्सा क्यू आता है?’

मुंबई। 

विधान परिषदेमध्ये नियम 260 अन्वये विरोधकांनी प्रस्ताव ठेवला होता. यामध्ये राज्यातील अनेक प्रश्नावर सरकारला धारेवर धरण्याचे काम विरोधकांनी केले होते. विशेष करून राज्यातील साखर (sugar factories in the state) कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप प्रवीण दरेकर (Praveen Darekar)  यांनी केला होता. या प्रस्तावावर मागील दोन दिवस चर्चा सुरू होती. या चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ( Ajit Pawar) विरोधकांनी लावलेल्या आरोपावर सडेतोड उत्तर दिले, मात्र जेव्हा विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर हे २६० प्रस्तावावर बोलत होते व ज्या आवेशाने ते बोलत होते ते पहाता, दरेकर साहब को गुस्सा क्यू आता है? असे अजित पवार म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की मी सुद्धा सहकार चळवळीतून पुढे आलेलो आहे. २६० या प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर ज्या आवेशाने व तावातावाने बोलत होते, ते पाहता मी सुद्धा अवाक झालो. शेवटी दरेकर साहब को गुस्सा क्यो आता है? असेच मला वाटले. सर्वांनी सहकाराला ताकद देण्याचे काम या अगोदरच्या सहकार मंत्र्यांनी केलेले आहे. परंतु आता ती पहिली पिढी राहिलेली नाही. साखर कारखाने विकले गेले. त्यामध्ये भ्रष्टाचार झाला हे सांगणे सोपे आहे. परंतु याबाबत वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे. जरंडेश्वर साखर कारखान्याबाबत नेहमी आरोप केले जातात पण त्याची वस्तुस्थिती काय आहे हे सर्वांना माहित असायला हवे. जरंडेश्वर प्रकरणावरून होत असलेले आरोप खोडून काढताना या गोष्टीला आता अनेक वर्षं झाली आहेत. परंतु त्याचा आता अतिरेक झाला आहे. यामध्ये असे आकडे सांगितले जातात की डोकं चक्रावून जात. इतक्या हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा वारंवार सांगितले जात आहे. मागच्या सरकारने सीआयडी चौकशी केली. एसीबीने चौकशी केली. इओडब्लू चौकशी केली. सहकार विभागाने न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या माध्यमातून चौकशी केली परंतु त्यामध्ये कोणाला काहीही गैर प्रकार सापडलेला नाही, असेही अजित पवार म्हणाले. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या कमिटीने सुद्धा काही निर्णय घेतले होते व साखर कारखाने उच्च किमतीमध्ये विकले गेले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *