Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia has written a letter to the Lt. Governor demanding that the CBI investigate the Rs 6000 crore toll tax scam in the Delhi Municipal Corporation. In his letter, Sisodia said that the money taken from around 10 lakh commercial vehicles plying in Delhi every day was extorted in connivance, and also asserted that if an honest inquiry was conducted, senior BJP leaders would be in jail.

Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia: ६००० कोटींचा घोटाळा… तर भाजपचे बडे नेते तुरुंगात

नवी दिल्ली ।दिल्ली महानगरपालिकेतील ६००० कोटी रुपयांच्या टोल टॅक्स घोटाळ्याची  सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया  (Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia) यांनी उपराज्यपालांना   पत्र लिहून केली आहे. दिल्लीत दररोज येणाऱ्या सुमारे  १०  लाख व्यावसायिक वाहनांकडून घेण्यात आलेले पैसे संगनमताने हडप करण्यात  आले,(CBI investigate the Rs 6000 crore toll tax scam in the Delhi) असे सिसोदिया यांनी आपल्या पत्रात म्हटले असून प्रामाणिकपणे चौकशी झाली तर भाजपचे बडे नेते  (senior BJP leaders)तुरुंगात असतील असा ठाम दावाही केला आहे. 

मनीष सिसोदिया यांनी उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांना पत्र लिहले  आहे. त्या पत्रात म्हटल्यानुसार, भाजपाने एमसीडीवर टोल टॅक्स कंपनीसोबत संगमनमताने सुमारे ६००० कोटींचा घोटाळा  केला आहे. भाजपने २०१७ साली एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड नावाच्या कंपनीला वार्षिक १२०० कोटी या दराने पाच वर्षांसाठी कंत्राट दिले होते. पहिल्या वर्षी पैसे दिल्यानंतर कंपनीने कधी १० टक्के तर कधी २० टक्के रक्कम दिली. मात्र  कंपनीवर कारवाई करण्याऐवजी कंत्राट सुरूच ठेवण्यात आले.२०२१मध्ये  हेच कंत्राट शहाकार ग्लोबल लिमिटेड नावाच्या कंपनीला फक्त ७८६ कोटींना देण्यात आले होते, जे एमसीडीला फक्त२५० कोटी देते. भाजपनेही कोरोनाच्या काळात नवीन कंपनीला ८३ कोटींची सूट दिली. दोन्ही कंपन्यांचे मालक एकच आहेत, संगनमत केल्याशिवाय हे सर्व शक्य नाही, असा आरोप उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला. या घोटाळ्याची उपराज्यपालांकडे चौकशीची मागणी करत ते म्हणाले की, प्रामाणिकपणे चौकशी झाली तर भाजपचे बडे नेते तुरुंगात असतील.दरम्यान आम आदमी पक्षाचे आमदार आणि एमसीडीचे प्रभारी दुर्गेश पाठक यांनीही एक दिवस आधी  पक्षाच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेत टोल टॅक्सशी संबंधित भ्रष्टाचाराबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली होती. नवीन कंपनीसुद्धा पूर्ण पैसे न देता केवळ २५० कोटी देत ​​आहे. २०१७ ते २०२२ पर्यंत दिल्लीतील लोक सुमारे १२०० कोटींचा टोल टॅक्स भरत आहेत. जो एमसीडीच्या खात्यात असायला हवा होता. मात्र या कंपन्यांकडून एमसीडी पैसे वसूल करत नाही, असा आरोपही दुर्गेश पाठकांनी केला  होता.(6000 Crore Scam… Big BJP Leaders In Jail)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *