Sanjay Raut: Hindutva traitor, Maharashtra traitor... Devendra Fadnavis is the real Chief Minister

Criticism of Sanjay Raut:शिवसेनेमुळे भाजप नेत्यांची झोप उडाली

 नागपूर। 

महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची झोप शिवसेनेमुळे   उडालेली आहे. त्यामुळेच की काय मोदीजींचे झोपेचे दोन तासही कमी करण्याच्या मागे महाराष्ट्रातील नेते लागले आहे, असा खोचक टोला शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर  लगावला.

 ते नागपुरात प्रसार माध्यमांशी  बोलत होते. ते आजपासून चार दिवस विदर्भाला संपर्क अभियान दौऱ्यावर आहे.यावेळी  ते म्हणाले ,पंतप्रधान मोदीजी (Prime Minister Modiji works almost 22 hours a day) जवळजवळ 22 तास काम करतात हे सगळ्यांना माहीत आहे. मी दिल्लीत सर्वाधिक काळ असतो;पण आता उरलेले दोन तासही त्यांना झोपू द्यायचे नाही, असे भाजपच्या ( BJP MAHARASHTRA )  महाराष्ट्रातील नेत्यांनी ठरवले असावे. त्यानुसार भाजपचे नेते कामाला लागले असल्याची टीकाही  (Criticism of Sanjay Raut) राऊत यांनी केली.
 
मुंबईकराना नागपूर प्रिय

नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. नागपुरातील नेत्यांना मुंबई (MUMBAI)  प्रिय आहे. आम्हा मुंबईकराना नागपूर( NAGPUR)  प्रिय आहे, असे म्हणत भाजपला टोला लगावला आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुका लक्षात घेऊन शिवसंपर्क अभियानाला सुरवात केली असल्याचे संजय राऊत म्हणाले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांच्या आदेशाने विदर्भ मराठवाड्यात शिवसंपर्क अभियान सुरू करण्यात आलेले आहे. मराठवाडा आणि विदर्भ सगळे खासदार अभियानावर निघालेले आहे. शिवसेनेचे खासदार विदर्भातील जिल्ह्यात पोहचतील मुंबई आणि ठाण्यातून 20 लोकांची टीम त्यांच्या सोबत असेल. चार दिवसांनी सर्व मिळून एकत्रपणे मुंबईत एकत्र भेटून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे याना अहवाल सादर करू, असेही संजय राऊत म्हणाले.सर्वाधिक ईडीच्या कारवाई मोदी सरकारच्या काळात झालेली आहे. संपूर्ण देश सोडला; पण पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात भाजपच्या कार्यकर्त्यांप्रमाणे केंद्रीय तपास यंत्रणा ईडीचे अधिकारी काम करतात, अशी टीकाही केली. सर्वाधिक कारवाईचा विक्रम केला आहे, असेही राऊत म्हणाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *