Criticism of Modi: 'Wrong Prime Minister seen by our generation'

Criticism of Modi: ‘आमच्या पिढीने पाहिलेले चुकीचे पंतप्रधान’

पुणे|
पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) यांनी लोकसभेत भाषण करताना महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम केले आहे. होऊ घातलेल्या निवडणुकीच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अशा पद्धतीने वक्तव्य करणे चुकीचे असून याचा निषेधार्थ   आम्ही आंदोलन करत आहोत. पंतप्रधान हे निवडणूक जिंकण्यासाठी संघ राज्यात कशा पद्धतीने भांडणे लावू शकतो ,हे याचे उदाहरण आहे. आमच्या पिढीने पाहिलेले चुकीचे पंतप्रधान हे आमच्यासाठी दुर्दैवी आहे अशी टिका   राष्ट्रवादीचे  शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संसदेत भाषण करताना काँग्रेसमुळे कोरोना पसरल्याची ( Prime Minister Narendra Modi fears Congress party ) टीका केली. त्यावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यावर  पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आंदोलन ( NCP Agitation in Pune ) करण्यात आले.यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राबाबत जे विधान केले आहे. ते  दुर्दैवी असून येणाऱ्या काळात याच महाराष्ट्रातील जनता भारतीय जनता पक्षाला त्यांची जागा दाखवेल असा इशारा देखील यावेळी जगताप यांनी दिला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *