Senior Nagpur lawyer Satish Uke has been raided by the ED. Congress state president Nana Patole has alleged that attempts are being made to implicate lawyers who speak against BJP leaders. Therefore, taking this seriously, the High Court and the Supreme Court should remove Sumoto and save the country's democracy, Nana Patole has asked the courts

भाजपानिर्मित बरबादीच्या विरुद्ध काँग्रेसचे  जन जागरण अभियान 

मुंबई|एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यानंतर राज्यातील मंत्री नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलंय. आज पत्रकार परिषद घेत मलिकांनी फडणवीसांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान या प्रकरणावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर टीका केली. भाजपानिर्मित बरबादीच्या विरुद्ध आवाज बुलंद करण्यासाठी काँग्रेस १४ ते १९ नोव्हेंबरपर्यंत जनजागरण अभियान करणार असल्याचे पटोले यांनी नमूद केले.   

नाना पटोले म्हणाले,  नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांनी ऐकमेकांवर आरोप लावले आहेत. याबाबत न्यायालयात त्यांनी पुरावे द्यावे. पण काँग्रेस पक्षाची जनेतेच्या आणि देशाच्या प्रश्नावर लढाई लढण्याची भुमिका आहे. आम्हाला कोणाच्याही व्यक्तिगत जीवनात रस नाही. जनतेचे मुळ प्रश्न घेऊन काँग्रेस लढत आहे. समीर वानखेडे प्रकरणात देखील आमची भूमिका ठाम होती. क्रुझ ड्रग्ज पार्टीतील सीसीटीव्ही फुटेज जाहीर करण्याची मागणी त्यावेळी आम्ही केली होती. मात्र एनसीबीने त्याबाबत कुठलंही फुटेज जाहीर केल नाही. आर्यन खान हाच फोकस त्यांनी ठेवला. केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर या प्रकारे हिंदू मुस्लिम वाद करुन महाराष्ट्रला मुंबईला बदनाम करण्याच काम भाजपा सरकार करत आहे. सुशांत सिंह प्रकरणात देखील बिहारच्या निवडणुकीसाठी भाजपाने राजकारण केलं.शाहरुख खान कडून खंडणी प्रकरणात भाजपाचेच लोक होते. क्रुझ पार्टीनंतर जे फोटो समोर आली त्यावरुन ते स्पष्ट होते. हे लोक भाजपाचे नाहीत असे ते म्हणूच शकत नाहीत. असे प्रश्न निर्माण करुन भाजपा लोकांचे देशातील मुळ प्रश्नावरुन लक्ष हटवत आहे. मात्र काँग्रेस मुळ प्रश्न घेऊन लढत आहे. काँग्रेसमुळे या देशाला स्वतंत्र मिळाले आहे. काँग्रेसने आपल्या विचाराने देशाला उभं केलं आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या प्रत्येक भूमिकेवर हा देश उभा केला आहे. त्यामुळे देशाला बरबाद होताना काँग्रेस बघणार नाही. ज्याप्रकारे भाजपा देशाला बरबाद करत आहे. हे काँग्रेस सहन करनार नाही”, अशी भूमिका नाना पटोले यांनी मांडली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!