मुंबई।सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीतून शिंदे-फडणवीस सरकार इतके दिवस झाले तरी मंत्रीमंडळ विस्तार का करत नाही याचे कारण जनतेला कळले असेल. असे ट्विट काँग्रेस नेते सचिन सावंत (Congress leader Sachin Sawant) यांनी केले आहे.
एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर अनेक कायदेशीर पेच निर्माण झाले असून, यासंदर्भात दाखल झालेल्या सर्व याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सरन्यायायाधीश एन.व्ही. रमणा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली या तीन न्यायमूर्तींच्या पीठासमोर ही सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकूण घेतल्यानंतर ही सुनावणी उद्यावर ढकलली आहे.
निकाल उद्या काय येणार?
शिवसेना आमदारांवरील अपात्रतेची कारवाई, अविश्वास प्रस्ताव आलेला असताना विधानसभा उपाध्यक्षांना कारवाईचे अधिकारांपासून ते केंद्रीय निवडणूक आयोगात होणारी सुनावणी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शिवसेनेच्या गटनेते पदी आणि प्रतोदपदी नियुक्त्यांना दिलेली मंजूरी आदी याचिका न्यायप्रविष्ट आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल उद्या काय येणार, याची सगळ्यांना उत्सुकता आहे.(Congress leader Sachin Sawant: People must know the reason why the cabinet is not expanding)