Congress defeated in five states

Congress defeated in five states: आता आत्मपरीक्षण

नवी दिल्ली । 
नुकताच पार पडलेल्या  पाच राज्यातील निवडणुकांमध्ये (Congress defeated in five states) काँग्रेसची कामगिरी  निराशजनक राहीली आहे. त्यामुळे पक्षाच्या गोटात असंतोष धुमसत असून नेतृत्व बदलाची मागणी करण्यासाठी एक गट एकवटला आहे. या पार्श्वभूमीवर   आता काँग्रेसने आत्मपरीक्षणाचा (introspection) मार्ग निवडला आहे. त्यानुसार  पाचही राज्यातील कामगिरीचे मुल्यमापन करण्यासाठी  नेत्यांची  नियुक्ती करण्यात आली आहे.
 निवडणुकीतील काँग्रेसचे प्रदर्शन आणि संघटनात्मक बदल सुचवण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे.
  रजनी पाटील यांना गोवा, जयराम रमेश यांना मणिपूर, अजय माकन यांना पंजाब, जितेंद्र सिंग यांना उत्तर प्रदेश आणि अविनाश पांडे यांना उत्तराखंडची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार या राज्यातील निवडणुकांमध्ये काँग्रेसची कामगिरीचे मुल्यमापन हे नेते करणार आहे आणि अहवाल सादर करणार आहेत. मात्र या नियुक्तीवरून काय साध्य होणार हा मुद्दाही काँग्रेसच्या वर्तुळात गाजणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *