पुणे ।आज देशातील प्रत्येकाचे जनजीवन हे महागाईने कठीण होत चालले आहे. रोजच्या जेवणाचा प्रश्न गंभीर होताना दिसत आहे. आज प्रत्येकाचे आर्थिक हिशोब हे कोलमडले आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर देशात सातत्याने महागाई वाढत आहे. भाजप हे जनतेशी (BJP is doing politics with the people) राजकारण करत आहे. जनतेचं काम करत नाहीये, अशी टिका काँग्रेसचे नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Congress leader and Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी केली आहे.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने (Pune City District Congress Committee) अलका टॉकीज चौक येथे काँग्रेस पक्षाचे नेते व महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘महागाई मुक्त भारत’ (‘Inflation Free India’)आंदोलन करण्यात आले. यावेळी महागाईची उपहासात्मक गुढी उभारून भाजपचा निषेध व्यक्त करण्यात आला. देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून सातत्याने महागाईमध्ये वाढ होत आहे.आमचं सरकार आणा , स्वस्ताई आणू असे जे आश्वासन देण्यात आले होते. त्याचं काय झाले. जे आश्वासन दिले होते, ते तर पूर्ण केले नाही; पण महागाई वाढवली आहे. गोरगरीब जनतेच्या खिशातून पैसे काढण्याचा प्रकार हा भाजपने 2014 पासून सुरू केला आहे. या महागाईच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्यावतीने देशभर आंदोलन करण्यात येत आहे. भाजपचे (BJP) जे नेते एक रुपया जरी महागाईमध्ये वाढ झाली तरी रस्त्यावर यायचे, ते आता कुठे लपून बसले आहे. त्यांना शोधून काढले पाहिजे, असे यावेळी थोरात म्हणाले.