पैठण।आज समोर जी गर्दी आहे, तीच सांगते बाळासाहेबांची खरी शिवसेना (real Shiv Sena) कुणाची आहे. असे म्हणत, एकदा मी आश्वासन दिले तर ते पुर्ण करुनच थांबतो. तिथे मग मी स्वत:चेही ऐकत नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनी पैठण येथील जाहीर सभेत केले.
कॅबीनेट मंत्री संदिपान भुमरे यांनी त्यांच्या पैठण मतदारसंघाच्यावतीने शिंदे यांच्या जाहीर सत्कार कार्यक्रमानिमित्त ते सोमवारी (१२ सप्टेंबर) रोजी आयोजित सभेत बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘आमच्या लोकांना गद्दार आणि खोके म्हणण्यापेक्षा आपण आत्मपरिक्षण करावं. जनतेच्या मताशी, बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा कोणी केली याचाही विचार करावा,अशा शब्दात नाव न घेता शिंदे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांना टोला लगावला. तसेच, अजितदादा सकाळी सहाला काम सुरू करतात असं कोणीतरी म्हणाले, त्यांना मी सांगतो, हा एकनाथ शिंदे सकाळी सहा वाजेपर्यंत कामच करत असतो असा जोरदार पलटवार शिंदे यांनी यावेळी केला.
पैसे देऊन जबरदस्तीने जमवलेली गर्दी नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पैठणमधील सभेत गर्दी जमवण्यासाठी स्थानिक आमदार आणि मंत्री संदीपान भुमरे यांनी पैसे वाटल्याचा गंभीर आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाने केला. याबाबत एक ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली. यावर स्वतः एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली.ते म्हणाले ,ही पैसे देऊन जबरदस्तीने जमवलेली गर्दी नाही. ही सर्व प्रेमाने आलेली माणसं आहेत,असा दावा त्यांनी केला. (CM Eknath Shinde:… So I don’t even listen to myself!)