मुंबई ।मुंबई मॅरेथॉनमध्ये (Mumbai Marathon) सर्वच धावतात. आम्ही सुद्धा धावलो. सुरत व्हाया गुवाहाटी, गोवा मार्गे मुंबई. आमची मॅरेथॉन अवघड होती;पण आम्ही पार केली आणि जिंकलोही. तुम्हाला पदक मिळते. आम्हाला पहिले येऊन सुध्दा पदक मिळत नाही. सुमारे ३० वर्ष धावल्यानंतर मुख्यमंत्री झालो, अशी तुफान फटकेबाजी करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी आम्हाला ‘हाफ मॅरेथॉन’ची संधी मिळाली, पुढच्या वेळी फुल मॅरेथॉन करू असे सूचक विधान केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते टाटा मुंबई मॅरेथॉन (Tata Mumbai Marathon 2023)उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ते म्हणाले, आम्ही एक मोठी शर्यत जिंकून आलो आहे. मुंबई व्हाया सुरत व्हाया गुवाहाटी. आमची मॅरेथॉन अवघड होती. पण आम्ही मॅरेथॉन पार केली आणि जिंकलो. आता मॅरेथॉनवाले पळतात; पण आम्हीही पळतो आणि पळवतोही. मात्र भूमिका बजवावी लागते.मात्र तुम्हाला पदक मिळते आम्हाला पहिले येऊन पदक मिळत नाही. कधी मागे राहिलो तर मिळतोही, असे मिस्कील विधान करताना आमच्याबद्दल सगळ्यांना वाटत होते , काय होईल ?जेव्हा आम्ही तिकडे गेलो होतो. लढाई अवघड होती. ३० वर्षे धावल्यानंतर मुख्यमंत्री बनलोय आहे ,असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना भेटलो. त्यांनी बराच वेळ आम्हाला दिला. पंतप्रधान मोदी म्हणाले, सर्व जनतेला न्याय देणारे सरकार हवे आहे. मी जे विधान भवनात भाषण दिले, हृदयातून बोललो. ते मोदींना आवडले. सर्व लोकांना या सरकारमध्ये संधी द्या असे पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच केंद्र सरकार हे राज्य सरकारला मदत करेल अशी ग्वाही दिल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी नमूद केले. हे डबल इंजिनवाले सरकार आहे.मात्र हे जलद धावणार. आम्हाला ‘हाफ मॅरेथॉन’ची संधी मिळाली, पुढच्या वेळी फुल मॅरेथॉन करू असे सूचक विधानही मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.(Chief Minister Eknath Shinde: We got a chance to ‘half marathon’, next time we will do full marathon!)