मुंबई ।पुर्वीचे सरकार अजित पवारच चालवत असल्याने त्यांना आमच्या सरकारचा त्रास होणारच असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना टोला लगावला.
ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) उपस्थित होते. इतिहासात पहिलीच वेळ आहे की, सध्या महाराष्ट्रात कुठल्याच तालुक्यात दुष्काळ नाही असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला. दरम्यान धर्मवीर सिनेमात एकनाथ कुठंय हा डायलॉग आहे, त्याचा उल्लेख नुकताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला होता त्यावर बोलताना शिंदे यांनी ‘एकनाथ इथेच आहे’ असे प्रतिउत्तर दिले आहे.
आम्ही ग्राऊंडवर जाऊन काम करणारे लोक आहोत. गडचिरोली जिल्ह्यात पुर परिस्थिती असताना आम्ही प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. त्यावेळी पाऊस सुरु होता. हेलिकॉप्टरचा पायलेट म्हणाला, पाऊस सुरु असल्याने आपल्याला जाता येणार नाही. त्यावेळी आम्ही तात्काळ बाय रोड जाण्याचा निर्णय घेतला आणि परिस्थितीची पाहणी करून आढावा बैठकही घेतली. असेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. तसेच विरोधी पक्षनेत्यांनीही पाहणी केली ;पण पुर ओसरल्यावर त्यांनी पाहणी केली असा टोलाही त्यांनी लगावला.(Chief Minister Eknath Shinde: … Ajit Pawar will have trouble with our government)