Chandrasekhar Bawankule: Any Challenge ready to be accepted

Chandrasekhar Bawankule:कुठलेही चॅलेंज स्वीकारायला तयार

नागपूर । अजित पवार (Ajit Pawar) हे आठ-आठ दिवस मोबाइल स्वीच ऑफ करून अंडरग्राऊंड होऊन जातात. त्यांनी विदर्भात येऊन चॅलेंज करू नये. त्यांचे कुठलेही चॅलेंज (challenge is ready to be accepted) स्वीकारायला तयार आहे. अशी भाषा नागपुरात करू नये, असे प्रत्युत्तर भाजपचे ( BJP )  प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी दिले.

विरोधी पक्षनेते  अजित पवार यांनी विधानसभेत (Vidhansabha  discussion)नियम २९३ अन्वये सुरू केलेल्या चर्चेत    तुफान फटकेबाजी केली होती.  त्यावेळी मी एखाद्याला चॅलेंज केले ना, तर कोणाच्या बापाला ऐकत नाही. सरकार आल्यानंतर तुम्ही संधी दिलेले एक नेते बारामतीत आले. बारामतीत (Baramati)घड्याळ बंद करण्याचा ‘करेक्ट’ कार्यक्रम करू, असे ते म्हणाले. आता मी मनावर घेतले ना तर त्यांचाच ‘करेक्ट’ कार्यक्रम (‘Correct’ program) करीन. जरा सबुरीने घ्या म्हणावं . खूपच स्पीडने चालले ते,असा इशारावजा टोला   नाव न घेता भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांना लगावला होता.  या इशाऱ्याला प्रत्युत्तर देताना  बावनकुळे यांनी  हल्लाबोल केला आहे. 

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,   जेंव्हा जेंव्हा  राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आली. तेव्हा सत्तेची संपूर्ण फळे अजित पवारांनी चाखली. खरे तर जयंत पाटील यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड व्हायला हवी होती. तुम्ही फडणवीसांची बरोबरी करायला निघाले. ते करू शकत नाही. देवेंद्रजी स्पायडरमॅनसारखे काम करताहेत. त्यांच्यापुढे अजित पवार एक टक्काही नाहीत, असा टोला त्यांनी हाणला.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की,जेंव्हा  उद्धव ठाकरे आणि अजित पवार पदावर होते. तेव्हा त्यांनी विदर्भ, मराठवाड्यासोबत बेईमानी केली. अधिवेशनच घेतले नाही. त्यामुळे तुम्हाला बोलायचाच अधिकार नाही. अजित पवार २२ वर्षे सत्तेत होते. मात्र, अजूनही पश्चिम महाराष्ट्रातला भाग दुष्काळी आहे. ओबीसी आरक्षणाची फाइल तर अजित पवारांनी फेकून दिली होती. माझा करेक्ट कार्यक्रम करण्याची हिंमत अजित पवारांमध्ये नाही.असे बावनकुळे म्हणाले.(Chandrasekhar Bawankule: Any Challenge ready to be accepted) 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *