पुणे ।गेली दोन वर्षे कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमिवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी घरीच बसून जनतेला संबोधित केले. मात्र, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Leader of the Opposition Devendra Fadnavis) हे रस्त्यावर फिरत होते. त्यानंतर मुख्यमंत्री हे आजारी झाले. अन आत्ता अडीच वर्षाने मुख्यमंत्री हे मंत्रालयात यायला लागले आहे. ही बाब खूप स्वागतार्ह आहे आणि चांगली आहे. आता तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कमान हातात घ्यावी आणि फक्त मंत्रालयात येऊ नये, तर राज्यभर फिरावे असा सल्ला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल तसेच महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून राज ठाकरे हे भाजपची बी टीम असल्याचा आरोप होत असल्याच्या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीशी बोलताना पाटील म्हणाले, राज ठाकरे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली आहे. आता महाविकास आघाडी सरकारचं कसं चाललं आहे, तुम्ही किती चांगले असे म्हटले तर काही अडचण नाही मग तुम्ही एक दोष दाखवला तर तुम्ही वाईट असं एकंदरीत आहे,असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.