मुंबई ।गेल्या सव्वा महिन्यापासून लांबलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला.मंत्रिमंडळ विस्तारापाठोपाठ लगेच खाते वाटपही होणार आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant patil )यांची वर्णी लागल्याने त्यांच्याकडे पुन्हा एकदा महसूल खाते सोपवली जाण्याची दाट शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रथेनुसार एक व्यक्ती एक पद असा दंडक असल्याने चंद्रकांत पाटील यांच्याकडे मंत्री पदाची जबाबदारी आल्यानंतर त्यांच्याकडील प्रदेशाध्यक्षपद त्यांना सोडावे लागणार आहे.
भारतीय जनता पक्षातील अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे प्रदेशाध्यक्ष हे पद आता मुंबईचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्याकडे सोपवले जाण्याची दाट शक्यता आहे. शेलारांना सध्या तरी मंत्रिमंडळात स्थान मिळणार नसल्याने त्यांच्याकडे या पदाचा भाग सोपवला जाण्याची शक्यता आहे.त्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तसेच गतवेळी त्यांनी केलेली कामगिरी पाहता,हे पद त्यांच्याकडेच जाणार असे तूर्तास तरी चित्र आहे. मात्र ऐनवेळी महिलेकडे प्रदेशाध्यक्ष पद देण्याची रणनीती भाजपाची असू शकते. त्यामुळे ती व्यक्ती कोण यावरही चर्चा सुरु आहे. Chandrakant patil inclusion in the cabinet: Ashish Shelar as state president of BJP?