पुणे|मंगळागौरी हा खेळ जर कोणी खेळात जोडला तर काही ऑब्जेक्शनच नसेल. माझे म्हणणे तर असे आहे की विटीदांडूही घ्या. जे भारतीय खेळ हे दुर्मिळ होत चालले आहे ते घ्या, अशी भूमिका एकनाथ शिंदे सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी (Chandrakant Patil) मांडली आहे.
शिंदे सरकारमध्ये चंद्रकांत पाटील यांना कॅबिनेट मंत्री मिळाल्याबद्दल ब्राह्मण महासंघाच्या वतीने (Brahmin Federation) चंद्रकांत पाटील यांचे त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते.(Minister Chandrakant Patil on Govinda reservation) महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आणि परंपरा असलेल्या दहिहंडीच्या (गोविंदा) प्रो गोविंदा स्पर्धा घेण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Chief Minister Eknath Shinde) विधानसभेत केली. स्पर्धेसाठी बक्षिसाची रक्कम शासनातर्फे देण्यात येईल. त्याचबरोबर खेळाडू संवर्गातून शासकीय नोकरी (govinda reservation in jobs) देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले होते. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर विरोधकांसह विद्यार्थी प्रतिनिधींनी यावर आक्षेप घेत सरकारवर टिका सुरु केली आहे. मंगळागौरीला देखील मान्यता देण्यात यावी, अशीही मागणी आता होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले की, मागणी करावी, वैध असेल तर जोडायला काहीही हरकत नाही. मंगळागौरी हा खेळ जर कोणी खेळात जोडला तर काही ऑब्जेक्शनच नसेल. माझे म्हणणे तर आहे की विटीदांडूही घ्या. जे भारतीय खेळ हे दुर्मिळ होत चालले आहे ते घ्या, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. खेळाडूंसाठीच्या ५ टक्के नोकरीच्या आरक्षणामध्ये दहीहंडी हा खेळ जोडण्यात आला आहे. हे आरक्षण नव्याने देण्यात आलेले नाही. उद्या जर कोणी म्हटले की विटीदांडू हा खेळ जोडा तर हा खेळही जोडला जाऊ शकतो. इतके सोपे असताना समाजाची दिशाभूल करण्याचे काम काही लोक करत आहे, असे देखील यावेळी पाटील म्हणाले.(Chandrakant Patil: Government jobs for Govinda… If Manglagauri, Vitidandu gets approved, they will also be under reservation!)