औरंगाबाद । मुंडेमुळे भाजप (BJP )वाढला. भाजपमध्ये बरेच राजकारण चालते, त्यावर मला बोलायचे नाही. सुनील शिंदे खूप छोटे आहे ;पण त्यांचे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंशी बोलणे झाले. पंकजा मुंडेंना मातोश्रीचा दरवाजा कधीही उघडा आहे, हे खुद्द उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे. माझी इच्छा आहे की, आमच्या कन्येने आमच्या पक्षात यावे. अशी खुली ऑफर सुनील शिंदेंनंतर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Shiv Sena leader Chandrakant Khaire)यांनी आज पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) दिली.
चंद्रकांत खैरे म्हणाले,मराठवाड्यातील गावागावात भाजप पक्ष पोहोचवण्याचे काम भाजपचे नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांनी केले. त्यांची मुलगी पंकजा मुंडे यांच्यावर भाजप अन्याय करत आहे. पंकजा मुंडे या खऱ्या युतीमधील खऱ्या वारस आहे, असेही चंद्रकांत खैरे म्हणाले.
आमदार सुनील शिंदे म्हणाले, पंकजा मुंडे फार मोठ्या नेत्या आहेत. त्यांचा पक्ष मोठा आहे. त्यामुळे त्यांचे मत आणि त्यांच्या क्रिया-प्रतिक्रियेशी माझा काहीही संबंध नाही.मात्र पंकजा मुंडे भाजपच्या फार मोठ्या नेत्या आहेत. त्यांच्यावर अन्याय होत आहे. हे आम्हाला दिसत आहे. पण हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत प्रश्न आहे. त्यामध्ये मी काहीही बोलणार नाही. पण त्यांच्या कर्तृत्वाला आम्ही नेहमीच सलाम करत राहू. पंकजा मुंडे पक्षात येत असतील तर त्यांचे स्वागत आहे.(Chandrakant Khaire: BJP grew because of Munde, our daughter should join our party)