Lok Sabha Election Survey: Majority at Centre; But there is a threat to BJP in Maharashtra

Cabinet meeting standoffish: भाजपच्या भूमिकेविरोधात शिंदे गट आक्रमक 

मुंबई।विधान परिषदेच्या(Legislative Council) जागा  आणि मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती (Mumbai’s Special Police Commissioner Deven Bharti) यांच्या नियुक्तीवरून भाजप (BJP) आणि शिंदे  (Shinde Group)गटाच्या आमदारांमध्ये (MLAs) खडाजंगी झाल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली  आहे. 

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी (तीन शिक्षक आणि दोन पदवीधर जागा) निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यातील तीन जागांवर भाजप तर दोन जागांवर शिंदे गट उमेदवार उभे करणार आहे. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये हा समझोता झाला होता. या परस्पर करारानुसार कोकण आणि नाशिकची जागा शिंदे गटाला मिळाली. मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोकण शिक्षक मतदारसंघातून ज्ञानेश्वर म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे म्हात्रे हे बदलापूरच्या शिंदे गटाचे शहराध्यक्ष यांचे बंधू आहेत. ज्ञानेश्वर म्हात्रे आता भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्षांनी म्हात्रे यांची उमेदवारी का जाहीर केली? मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे गटाने हा मुद्दा उपस्थित केला होता. हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याचे उत्तर भाजपने दिले. भाजपच्या ज्येष्ठ मंत्र्यांच्या या उत्तराने असंतुष्ट दादा भुसे यांनी नाशिकच्या जागेचा मुद्दा उपस्थित केला.

नाशिकमधून काँग्रेसच्या तरुण नेत्याला विधान परिषदेची उमेदवारी देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या या चर्चेचा संदर्भ देत ते म्हणाले की, नाशिकमधून शिंदे गटाचा उमेदवार निवडणूक लढवणार आहे. नाशिक विधानपरिषदेच्या जागेबाबत मुख्यमंत्री शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी भाजपवर उघडपणे टीका केली. या जागेचा उमेदवार त्यांच्या आणि शिंदे गटाच्या सहमतीनेच ठरवावा, असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे. 

विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून भाजप आणि शिंदे गोटात खडाजंगी होत असताना  मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांच्या नियुक्तीवरूनही  वाद झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून त्यांच्या गटातील एका ज्येष्ठ मंत्र्याने हा मुद्दा उपस्थित केला होता. अशी चर्चा मंत्रालयात सुरू आहे.

देवेन भारती यांची विशेष पोलिस आयुक्तपदी नियुक्ती केल्याने मुंबई पोलिसांमध्ये  नाराजीचे वातावरण आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधत शिंदे गटातील मंत्र्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांमध्ये जोरदार वादावादी सुरू होताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित असलेल्या वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले.(Cabinet meeting standoffish: Shinde group aggressive against BJP’s stand)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *