BJP's Strategy: Chief Minister's meeting 'Flop Show'; Cold war between Shinde-Fadnavis faction

BJP’s Strategy:   मुख्यमंत्र्यांची सभा  ‘फ्लॉप शो’; शिंदे-फडणवीस गटात शीतयुद्ध

मुंबई।शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघात (Shiv Sena leader Aditya Thackeray’s Worli assembly constituency) मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी कमी झाल्याने मुंबईतील एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांच्या लोकप्रियतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. यासोबतच मुंबई भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षात( Mumbai BJP and Eknath Shinde’s ‘Balasahebchi Shiv Sena’ party) सुरू असलेले अंतर्गत शीतयुद्धही उघड झाले आहे. शिवसेना (उद्धव गट) आणि राष्ट्रवादीचे नेते ज्या प्रकारे वरळी सभेला ‘फ्लॉप शो’ म्हणत मुख्यमंत्री शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांना लक्ष्य करत आहेत, त्यामुळे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप वाढत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वरळीतील सभा ‘फ्लॉप शो’ ठरल्याने शिंदे गटाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज झाले आहेत. वरळीच्या सभेला फडणवीस आले असते तर अधिक गर्दी जमली असती आणि मुख्यमंत्र्यांची सभा यशस्वी झाली असती, अशी भावना शिंदे गटाचे नेते खासगीत व्यक्त करत आहेत.तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  मंगळवारी  सायंकाळी मुंबईत होते. संध्याकाळी दाऊदी बोहरा समाजाच्या कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस यांनी बराच वेळ दिला. फडणवीस यांचा हा कार्यक्रम दक्षिण मुंबईत होता आणि मुख्यमंत्र्यांची सभाही दक्षिण मुंबईतील वरळी भागात होती. फडणवीस काही काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला उपस्थित राहू शकले असते. मात्र, वरळीच्या सभेला जाणे त्यांनी जाणीवपूर्वक टाळले, अशी चर्चा मंत्रालय आणि राजकीय विश्लेषकांमध्ये आहे.महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजे, हीच सर्व भाजप कार्यकर्त्यांची इच्छा होती. मात्र भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. मुंबई महापालिकेची निवडणूक आता तोंडावर आली आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्री शिंदे यांच्या गोटातील नेत्यांनी महापालिका निवडणुकीत जास्त जागांची मागणी करू नये, त्यासाठी मुंबईत त्यांची ताकद कमी आहे, हे दाखवणे भाजपसाठी आवश्यक झाले आहे. या रणनीतीअंतर्गत वरळीतील मुख्यमंत्र्यांच्या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणीवपूर्वक उपस्थित राहिले नाहीत, असे मानले जात आहे.(BJP’s Strategy: Chief Minister’s meeting ‘Flop Show’; Cold war between Shinde-Fadnavis faction)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *