While the work of BJP party spokespersons is continuing to make fun of Congress leader Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra, now the BJP party leadership is keeping a close eye on the response to Congress leader Rahul Gandhi. Interestingly, in the background of Bharat Jodo Yatra, BJP is planning to plan a nationwide tour of Prime Minister Narendra Modi with a specific name in the future.

BJP’s planning:’भारत जोडो’च्या धर्तीवर  नरेंद्र मोदींसाठी देशव्यापी  दौरा!   

नवी दिल्ली। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची(Congress leader Rahul Gandhi’s Bharat Jodo Yatra) खिल्ली उडवण्याचे काम भाजपच्या पक्षप्रवक्तांकडून सुरू असतानाच आता भाजपच्या पक्ष नेतृत्वाने मात्र काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मिळणाऱ्या  प्रतिसादावर बारीक लक्ष ठेवले आहे.  विशेष म्हणजे भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात एखाद्या विशिष्ट नावाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modiयांचा देशव्यापी दौरा  आखण्याचे भाजपचे  नियोजन (BJP’s planning) आहे.

सद्यस्थितीत  भाजपने गुजरातसह आगामी विधानसभांबरोबरच आगामी लोकसभा 2024 ची (BJP has started its campaign for the upcoming Lok Sabha 2024) मोहीम सुरू केली आहे.  भाजपच्या दिल्लीतील केंद्रीय कार्यालयात होणाऱ्या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीचा आराखडा ठरविण्यात येणार आहे.  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी.  नड्डा, केंद्रीय संघटन मंत्री बी.  एल.  संतोष यांच्या उपस्थित होणाऱ्या बैठकीत भाजपच्या सर्व आघाड्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी आपापल्या शाखांचे ‘रिपोर्ट कार्ड’ सादर करणार आहेत. 
विशेषतः गुजरातसह आगामी विधानसभा आणि दिल्ली एमसीडी निवडणुकीच्या मुद्द्यांवरही या बैठकीत चर्चा होणार आहे.  त्यातही खास करून राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात एखाद्या विशिष्ट नावाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशव्यापी दौरा आखण्याचे भाजपचे नियोजन असल्याची चर्चा आहे. 
भाजपाचा मीडिया सेल व अन्य वरिष्ठ  नेते या भारत जोडो यात्रेवर बारीक लक्ष ठेवून आहेत.  जिथे यात्रेला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.  त्या- त्या राज्यातील नेत्यांशी दिल्लीतून तातडीने संपर्क साधला जात असून चर्चाही केली जात आहे.(BJP’s planning: Nationwide tour for Narendra Modi on the lines of ‘Bharat Jodo’!)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *