inc bjp politics tweets electoral bond

भाजपचे ५० टक्क्यांनी  उत्पन्न वाढले आणि तुमचे?

नवी दिल्ली। 
भाजपचे ​५०टक्क्यांनी उत्पन्न वाढले आणि तुम​चे  किती​?​ असा सवाल ट्विटरवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशातील जनतेला विचारला आहे​. ​ ​ट्विटद्वारे भाजपवर निशाणा साधताना जोरदार टीकाही केली आहे​. 

असोसिएशन ​फॉर  डेमोक्रॅटिक ​रिफॉर्म्सच्या  आकडेवारीनुसार ​२०१९ -२० मध्ये भाजपच्या संपत्तीत ​३,६२३.२८ कोटी रुपयां​नी  वाढ​ली आहे​. ​ या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी भाजपच्या वाढलेल्या संपत्तीवरून जोरदार टीका केली आहे​. ​  असोसिएशन ​फॉर  डेमोक्रॅटिक ​रिफॉर्म्सच्या    (ADR ) अहवालानुसार भाजपला मिळणाऱ्या ​ निवडणूक रोख्यामध्ये (इलेक्टॉरल बॉण्डमध्ये) वाढ झाल्या​ने पक्षाच्या संपत्तीत वाढ झाली आहे​. ​
 
अहवालानुसार भाजपचे उत्पन्न हे ​३,६२३.२८ को​​टी​ रुपये ​  होते तर खर्च मात्र​१,६५१.०२२​ ​  कोटी रुपयांचा होता​. ​ दुसरीकडे काँग्रेस​चे  उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असल्याचे या अहवालातून  स्पष्ट झाले आहे​. ​ ​६८२२१. कोटी रुपयांचे उत्पन्न ​  काँग्रेस​चे होते मात्र खर्च​ हा ९९८.१५८कोटी रुपयांचा झाला आहे.  ​
 
इलेक्टॉरल बॉण्ड​ म्हणजे नक्की काय?
 
​राजकीय पक्षांना थेट देणगीतून पैसे मिळविण्यासाठी निवडणूक रोख्यांचा पर्याय असतो. मात्र त्यात पारदर्शकता नसल्याचा विरोधी पक्षांकडून आरोप होत असतो. असे असले तरी निवडणूक आयोगाने काही अटी शर्तीच्या अधीन राहून निवडणूक रोख्यांना परवानगी दिली आहे पण त्याबाबत राजकीय पक्षांनी  जाहीर कार्यक्रमात किंवा माध्यमांमध्ये जाहीर उल्लेख करू नये असे बंधनही घालण्यात आल्याचे वित्त मंत्र्यालयाने म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *