Barring Industries Minister Uday Samant, no BJP or Shinde faction leader has come forward to counter the opposition's criticism of the Tata-Airbus project. On the contrary, Shiv Sena (Thackeray group) and NCP leaders are constantly attacking the Shinde-Fadnavis government. After Vedanta-Foxcon, another big project in Maharashtra has gone to Gujarat, and currently Chief Minister Eknath Shinde is in a dilemma.

BJP’s dilemma with Eknath Shinde: विरोधकांच्या आरोपाला ठोस प्रत्युत्तर कोण देणार?

पुणे|टाटा-एअरबस प्रकल्पावरून विरोधकांकडून होणाऱ्या टीकेचा प्रतिवाद करण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत वगळता भाजप किंवा शिंदे गटाचा एकही नेता पुढे आलेला नाही. याउलट शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर सातत्याने हल्ले चढवले जात आहेत. वेदांत-फॉक्सकॉनपाठोपाठ महाराष्ट्रातील आणखी एक मोठा प्रकल्प गुजरातला गेल्याने सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी (BJP’s tussle with Eknath Shinde over Tata-Airbus project)झाल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्यात तीन महिन्यांपूर्वीच सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार आले. या तीन महिन्यांमध्येच महाराष्ट्रातील तीन मोठे प्रकल्प एकापाठोपाठ गुजरातला गेले. त्यावरून आरोपांच्या फैरी झडत आहेत मात्र प्रत्युत्तर देण्यासाठी मात्र सत्ताधाऱ्यांची आता कसरत होत आहे. त्यात शिवसेनेचे ( ठाकरे गट) नेते आमदार आदित्य ठाकरे यांनीही सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले आहे.
शिवराजसिंह चौहान आणि नवीन पटनायक हे इतर राज्यांमधील मुख्यमंत्री उद्योजकांना भेटण्यासाठी आपल्या राज्यात येतात; पण आपल्या मुख्यमंत्र्यांनी गेल्या तीन महिन्यांमध्ये काय केले आहे? आपले मुख्यमंत्री मंडळं, दहीहंडी, राजकीय भेटी आणि फोडाफोडी हे सोडून कुठल्याही दुसऱ्या राज्यात गेले नाहीत. याउलट शिवराज सिंह चौहान आणि नवीन पटनायक यांनी आपल्या राज्यात उद्योग नेण्यासाठी प्रो-अॅक्टिव्हपणे काम केले. त्याप्रमाणे आपल्या मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या राज्यांमध्ये जाऊन अशी एकही गोष्ट केलेय का, हे मला दाखवून द्यावे, अशा शब्दात  आदित्य ठाकरे यांनी टाटा-एअरबस प्रकल्पावरुन एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
टाटा-एअरबस हा २२ हजार कोटींचा प्रकल्प नागपूरच्या मिहान येथे प्रस्तावित होता. मात्र, ऐनवेळी हा प्रकल्प गुजरातच्या बडोद्यात गेला. यावरुन सध्या प्रचंड मोठा राजकीय वाद सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोचरी टीका करून त्यांना कोंडीत पकडले आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेला हा चौथा प्रकल्प आहे. खोके सरकारवर कुठल्याही उद्योजकाचा विश्वास उरलेला नाही. त्यामुळे आपल्या राज्यात येणारी गुंतवणूक आणि प्रकल्प दुसरीकडे चालल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
हे तिन्ही प्रकल्प एकाच राज्यात गेले, हा योगायोग म्हणायचा का? यावरुन एक शंका येते की, महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प गुजरातला नेण्यासाठीच राज्यात सत्तांतर घडवून आणण्यात आले का, असा सवाल माजी उद्योगमंत्री आणि ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी उपस्थित केला. विशेष म्हणजे वेदांता-फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क प्रकल्प आणि टाटा-एअरबस प्रकल्प गुजरातमध्ये जाण्याच्या ‘टायमिंग’कडे सुभाष देसाई यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.आता सत्ताधारी कोणते प्रत्त्युत्तर देतात आणि आरोपांच्या या फैरीतून कशी सुटका करून घेतात याकडेच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *