BJP’s dilemma over sugar factories:अजित पवार म्हणाले,दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल

मुंबई। विधानसभेमध्ये  (Assembly) प्रश्नोत्तराच्या तासात सहकारी साखर कारखाने खरेदी – विक्रीच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप खासदार योगेश सागर व आशिष शेलार (Question Hour in the Assembly, Leader of Opposition Devendra Fadnavis, BJP MP Yogesh Sagar and Ashish Shelar) यांनी राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यावर राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सारवा सारव करणारी उत्तरे देण्याचा प्रयत्न केला.मात्र  अण्णा हजारे यांनी केलेल्या आरोपांवर सरकारला जाब विचारत हक्कभंग लागू करण्याचीही देवेंद्र फडणवीस यांनी मागणी केली. तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार उत्तर (Deputy Chief Minister Ajit Pawar stood up to answer) देण्यासाठी उभे राहिले.  अण्णा हजारे यांनी तुमच्याकडे व राज्यपालांकडे तक्रार केली होती. तुम्ही सीआयडी चौकशी लावली. ही चौकशी तुमच्या मुख्यमंत्री काळात झाली. या चौकशीत काहीच निष्पन्न झाले नाही, याकडे सभागृहाचे लक्ष वेधत भाजपलाच  कोंडीत पकडले.
अजित पवार  म्हणाले, उच्च न्यायालयाने आदेश दिला जे साखर कारखाने पैसे देऊ शकत नाही. ते कारखाने विका. त्यानुसार ही विक्री प्रक्रिया राबविली. अण्णा हजारे यांनी मागे तक्रार केली होती. एकदा त्यांना जाऊन भेटाव आणि कोणाच्या चौकशा झाल्या. सीआयडी, एसीपी, ईओडब्ल्यू, न्यायाधिशांकडून चौकशा झाल्या. त्यात काय झाले हे त्यांना सांगावे. दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल, असा टोलाही अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.
या राज्यात यशवंतराव मुख्यमंत्री आल्यापासून देवेंद्र फडणवीस असे पर्यंत साखर कारखान्यांना सर्रास  हमी देण्यात आली. उद्धव ठाकरे सरकार आल्यावर पंढरपूर कारखाना, शंकरराव काळे, धनंजय महाडिक कारखाने, संग्राम थोपटे अशा पाच कारखान्यांना हमी दिली. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले साखर कारखान्यांना राज्य सरकार हमी देणार नाही. अडीच वर्षे झाली जो तो आपले कारखाने चालवत आहेत, असेही अजित पवार यांनी सांगितले.
… मग कारखाने चालवायला घ्या
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा पोलिसांच्या आर्थिक अपराध शाखेला चौकशीचे आदेश दिले. न्यायाधीशांकडून चौकशी केली. त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री काळातच दोन चौकशा झाल्या, मात्र काहीही निष्पन्न झाले नाही. अनेक साखर कारखाने राज्य सहकारी बँकेला द्यायचे लोक आरोप करतात मग कारखाने चालवायला घ्या. साखर कारखाना खरेदी – विक्री बाबत फडणवीस यांच्यासह देशपातळीवर गैरसमज झालेला आहे. प्रत्येकाला साखर कारखाना चालवायचा अनुभव आहे. साताऱ्यात किसनवीर साखर कारखान्यावर ६२५ कोटींचे कर्ज झाले. आता कारखान्यापेक्षा कर्जच जास्त झाले. समस्या कुणाला माहीत नाही. मात्र, भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *