CM Eknath Shinde's advice: Everything is forgiven for Hindutva, Nitesh Rane's language has changed

BJP MLA Nitesh Rane:नोटीसा पाठवण्यापेक्षा मैदानात येऊन लढा!

सोलापूर ।
मुंबई महानगरपालिकेंतर्गत नोटीसा पाठवण्यापेक्षा मैदानात येऊन आमच्याशी लढा असे खुले आव्हान भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना (BJP MLA Nitesh Rane has openly challenged Chief Minister Uddhav Thackeray) दिले आहे. 
आमदार नितेश राणे हे सोलापूरहुन तुळजापूरकडे जाताना विमानतळावर माध्यमांशी संवाद साधला.ते म्हणाले,घराच्या बांधकामावरुन मिळालेल्या नोटीसीला कायदेशीर उत्तर देऊ. पण मुख्यमंत्री घरात बसून कंटाळलेले आहेत. नोटीसा पाठवण्यापेक्षा मैदानात येऊन आमच्याशी लढा. आताची शिवसेना बाळासाहेबांची नाही. ती दाऊदची बी टीम झाली आहे. हिंदुत्व सोडलेले आहे म्हणून ते अजाणची स्पर्धा घेत आहेत. जनाब बाळासाहेब हे सेनेच्या बॅनरवर शिवसेनेनेच लिहिले. आम्ही नाही लिहिले असेही  आमदार राणे म्हणाले.
… लाचार व्हायची गरज नाही
आम्हांला सत्तेसाठी लाचार व्हायची गरज नाही.महाराष्ट्राने पाहिलं आहे कोण लाचार आहे ते सर्वांना माहिती आहे.संजय राऊतांसारखी माणसं सोलापूरच्या बाजारात खूप भेटतात. त्याला किती महत्व द्यायचे ठरवून घेतले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *