BJP leader Chandrakant Patil: All MLAs go to Ajit Pawar without going to Matoshri

BJP leader Chandrakant Patil: सर्व आमदार मातोश्रीवर न जाता अजित पवारांकडे जातात

कोल्हापूर । भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (AJIT PAWAR )  यांचे कौतुक केले आहे. अजित पवार हे सडेतोड बोलणारे आहेत, म्हणून सर्व आमदार मातोश्रीवर न जाता अजित पवार यांच्याकडे जातात, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे  (CM Uddhav Thackeray ) यांना नाव न घेता लगावला आहे. प्रश्न सुटले पाहिजेत म्हणून लोक अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे जातात, असे ते यावेळी म्हणाले. 

ते कोल्हापुरात बोलत होते.यावेळी    चंद्रकांत पाटील  यांनी चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे   यांची कुंडली पाहिली आहे. काय भाग्यवान माणूस जन्माला आला आहे, त्यांना कशाचेच सोयरसुतक नाही, काही काम नाही, पण त्यांना सत्तेतून कुणीही हलवू शकत नाही हे त्यांचे भाग्य आहे, अशी कुंडलीच चंद्रकांत पाटील यांनी वाचून दाखवली. तसेच प्रश्न सुटले पाहिजेत म्हणून लोक अजित पवार   आणि एकनाथ शिंदे(  Eknath Shinde)  यांच्याकडे जातात, असे पाटील यावेळी म्हणाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *