kasba Assembly By-election: The defeat is not of Hemant Rasne but of BJP!

भाजपमधील निष्ठावंताच्या कुटुंबाला भाजपनेच अंधारात ठेवले!

मुंबई|हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना- भाजपमध्ये जुंपली असताना शिवसेना नेते संजय राऊत (  Shiv Sena leader Sanjay Raut) यांनी भाजपमधील निष्ठावंताच्या कुटुंबावर होणाऱ्या अन्यायाला वाचा आज फोडली आहे. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, मनोहर पर्रीकर यांच्या कुटुंबाला भाजपने अंधारात ठेवल्याचा घणाघात राऊत यांनी केला.
बेगडी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला होता. भाजपच्या जन्माअगोदर शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्यावर लढली असा दावा ही केला. यावरून जोरदार राजकारण रंगले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सर्वात प्रथम शिवसेनेचे निवडणूक लढवली. आता नवं हिंदू आले आहेत. भाजपने त्यांच्या इतिहासाची काही पाने फाडली आहेत. मात्र वेळोवेळी आम्ही त्यांना माहिती देत राहू, असा टोला फडणवीस यांना लगावला.
राऊत म्हणाले की, मी कुणावर टिका केली नाही. विलेपार्लेत विधानसभा निवडणुक झाली. बाळासाहेबांनी ओपन प्रचार केला. त्या निवडणूकीत काँग्रेस, भाजप दोघेही होते. आम्ही जिंकलो त्यानंतर सगळ्यांना झटका बसला होता. त्यावेळी ही हिंदूत्व वाढेल, निवडणुक या मुद्दांवर जिंकू शकतो, आम्ही एकत्र निवडणुक लढू शकतो असा प्रस्ताव प्रमोद महाजन, अटल बिहारी वाजपेयी यांनी मांडला होता. आताच्या नवहिंदूत्ववादी भाजप नेत्यांना सध्या माहीती नाही, असा चिमटा काढला.व्यक्तीगत प्रमोद महाजनांवर टिका नाही, ते कार्टून आर के लक्ष्मण यांनी काढले होते. भाजपच्या काही लोकांनी वक्तव्य केले आणि त्याकाळचा सत्य दाखवण्यासाठी आर के लक्ष्मण यांचे व्यंगचित्र ट्विट केले. पूनम महाजन यांना अस्वस्थ व्हायची गरज नाही, अजूनही ते कार्टून स्मरणात आहे. तसेच पर्रिकर, महाजन यांच्या कुटूंबियांशी आमचे नात घनिष्ठ आहे. भाजपकडून या नेत्यांच्या परिवाराला अंधारात ठेवले आहे, असे ही राऊत म्हणाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *